Gatari Amavasya 2026: आषाढ अमावस्येला ‘गटारी’ नाव कसे पडले? जाणून घ्या या दिवसाचे मूळ नाव, धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व

श्रावण महिन्यात चातुर्मासाचे कडक नियम पाळले जातात, ज्यामध्ये मद्यपान, मांसाहार, कांदा आणि लसूण यांसारखे पदार्थ वर्ज्य केले जातात.
Gatari Amavasya 2026: आषाढ अमावस्येला ‘गटारी’ नाव कसे पडले? जाणून घ्या या दिवसाचे मूळ नाव, धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व

Ashadh Gatari Amavasya: पवित्र श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या आषाढ अमावस्येला महाराष्ट्रात लोकप्रिय बोलीभाषेत ‘गटारी अमावस्या’ म्हणून ओळखले जाते. येत्या 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असून, त्यापूर्वी आषाढ अमावस्या साजरी केली जाणार आहे. या दिवसाबाबत अनेकांच्या मनात विविध समज-गैरसमज असतात. मात्र, या दिवसाचा मूळ अर्थ अतिमद्यपान किंवा बेधुंद होणे नसून, संयम आणि आहारातील बदलाची ती एक सांस्कृतिक सुरुवात मानली जाते.

आषाढ अमावस्या तिथी आणि पूजेची वेळ –
मराठी पंचांगानुसार आषाढ अमावस्येचा कालावधी 
– अमावस्या प्रारंभ – 11 ऑगस्ट 2026, रात्री 1:53 वाजता
– अमावस्या समाप्ती – 12 ऑगस्ट 2026, रात्री 11:06 वाजता
– दीप पूजेचा शुभ दिवस – 12 ऑगस्ट 2026

'गटारी' शब्दाची मूळ उत्पत्ती आणि खरा अर्थ
'गटारी' हा कोणताही अश्लील किंवा धार्मिकदृष्ट्या चुकीचा शब्द नसून, तो 'गतहारी' या संस्कृत व सांस्कृतिक शब्दाचा अपभ्रंश आहे. गताहारी म्हणजे 'ज्या तामसिक आहाराचा आता त्याग करायचा आहे असा दिवस'. काळाच्या ओघात गताहारीचा अपभ्रंश होऊन 'गटारी' हा शब्द रुढ झाला. 'अतिमद्यपान करून गटारात पडण्यावरून' हे नाव पडले हा निव्वळ एक विनोद असून त्याला कोणताही ऐतिहासिक किंवा धार्मिक आधार नाही. मूळ परंपरेनुसार हा दिवस आहारातील संयमाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे.

हेही वाचा – Surya Grahan August 2026 : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 12 ऑगस्टला! जाणून घ्या वेळ अन् भारतातील प्रभाव

गटारी साजरी करण्याची परंपरा आणि सामाजिक महत्त्व
श्रावण महिन्यात चातुर्मासाचे कडक नियम पाळले जातात, ज्यामध्ये मद्यपान, मांसाहार, कांदा आणि लसूण यांसारखे पदार्थ वर्ज्य केले जातात. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वीच्या शेवटच्या दिवशी कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत एकत्र येऊन आवडीचे पदार्थ खाण्याची पद्धत महाराष्ट्रात सुरू झाली. महिन्याभरासाठी ज्या आहाराचा त्याग करायचा आहे, तो आहार या दिवशी घेतला जातो, जेणेकरून पुढील महिनाभर सात्त्विक नियमांचे पालन करणे सुलभ जाते.

दीपपूजा आणि आषाढ अमावस्येचे धार्मिक महत्त्व
धार्मिक पंचांगात या दिवसाचा उल्लेख केवळ 'आषाढ अमावस्या' असाच केला जातो. या दिवशी घरोघरी दिव्यांची पूजा म्हणजेच 'दीपपूजा' करण्याची प्राचीन परंपरा आहे. घरातील अंधकार, नकारात्मकता दूर होऊन आरोग्य व सुख-समृद्धी नांदावी यासाठी दिव्यांची आरास करून प्रार्थना केली जाते. त्यामुळे बोलीभाषेतील गटारी या नावासोबतच या दिवसाला अत्यंत पवित्र असे धार्मिक व शास्त्रीय अधिष्ठान लाभलेले आहे.

हेही वाचा – Trimbakeshwar Temple: श्रावणात त्र्यंबकेश्वरला VIP एन्ट्रीला ब्रेक! 13 ऑगस्टपासून दर्शन व्यवस्थेत मोठा बदल, कारण काय? 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version