परबांचा बंगला तोडायला सोमय्यांचा आग्रह

परबांचा बंगला तोडायला सोमय्यांचा आग्रह

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील मविआ नेत्यांविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनेक पुरावे सादर केले आहेत. अशातच, आता किरीट सोमय्यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्यांनी अनिल परबांच्या रिसॉर्टचा फोटो ट्विट करत २६ तारखेला परबांचे रिसॉर्ट पाडायला जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनिल परब यांचा अनधिकृत रिसॉर्ट तोडायला किरीट सोमय्या आग्रह असून अनिल परब यांच्या दापोलीसीतल रिसॉर्टवर कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले होते. अलिबागमधील कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांनी १९ बंगल्यांचे कर भरला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा आरोप फेटाळून लावला. तसेच आता यासोबत किनारपट्टी भागांमध्ये अनिल परब यांचे बंगले असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. त्यामुळे सोमय्यांनी ट्विट करत २६ मार्चला परबांचा रिसॉर्ट तोडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांन दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version