शिंदेसमर्थकांचा राड्यानंतर शशिकांत शिंदेंचा माफीनामा

शिंदेसमर्थकांचा राड्यानंतर शशिकांत शिंदेंचा माफीनामा

  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले सातारा जिल्हा बँक निवडणूकीचे अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. अवघ्या एका मताने शशिकांत शिंदे यांचा पराभव करत ज्ञानदेव रांजणे विजयी झाले आहे. त्यामुळे सातारा बँक निवडणुकीत शशिकांत शींदे यांच्या शिंदेसमर्थकांनी राडा घातला. साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून घालण्यात आलेल्या राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी माफीनामा सादर केला आहे.

  शशिकांत शिंदे म्हणाले, ‘माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे. त्याबद्दल मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे’, असे ते म्हणाले.

   सातारा जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्यामुळे शिंदेसर्मथकांकडून स्वपक्षाच्याच कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक केली. शिंदेसर्मथकांकडून केलेल्या या दंगलीमुळे साताऱ्यात तणाव पाहायला मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version