मुंबई: आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहारदिवशी मंगळवार, 17 मार्च 2026 रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 हिरव्या निशानावर उघडले होते. मात्र बाजार सुरू होताच त्यामध्ये चढ-उतार दिसून आले आणि काही वेळातच दोन्ही निर्देशांक घसरत लाल निशानावर आले.
30 समभागांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 323.83 अंकांनी म्हणजे सुमारे 0.43 टक्क्यांनी वाढत 75,826.68 या पातळीवर उघडला होता. तर एनएसई निफ्टी 50 निर्देशांकानेही सकारात्मक सुरुवात केली होती. निफ्टी 84.40 अंकांनी म्हणजे 0.36 टक्क्यांनी वाढत 23,493.20 या पातळीवर व्यवहार सुरू झाले होते. मात्र सकाळी सुमारे 9:22 वाजेपर्यंत बाजारात घसरण दिसून आली. त्या वेळी सेन्सेक्स सुमारे 55 अंकांनी घसरून 75,447 अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 18 अंकांनी घसरून 23,390 या पातळीवर पोहोचला होता.
दरम्यान, बीएसईमधील काही प्रमुख समभागांमध्ये तेजी दिसून आली. बातमी लिहीपर्यंत एटरनल, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, मारुती आणि महिंद्रा अँड महिंद्रा हे समभाग टॉप गेनर म्हणून पुढे होते. तर एचसीएलटेक, टीसीएस, आयटीसी आणि टायटन या समभागांमध्ये घसरण दिसून आली होती.
यापूर्वी सोमवारी, 16 मार्च 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. त्या दिवशी व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 938.93 अंकांनी म्हणजे 1.26 टक्क्यांनी वाढत 75,502.85 या पातळीवर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 50 निर्देशांक 257.70 अंकांनी म्हणजे 1.11 टक्क्यांनी वाढत 23,408.80 या पातळीवर बंद झाला होता.
सोमवारी बीएसई निर्देशांकातील ट्रेंट, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एटरनल आणि आयटीसी हे समभाग टॉप गेनर होते. तर पॉवरग्रिड, सन फार्मा, भारती एअरटेल, एनटीपीसी आणि टीसीएस या समभागांमध्ये घसरण दिसून आली होती.
तसेच निफ्टी 100, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी या निर्देशांकांमध्ये वाढ झाली होती. मात्र निफ्टी स्मॉलकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी मिडकॅप 100 या निर्देशांकांमध्ये घसरण नोंदवण्यात आली होती. सोमवारी बीएसईमधील 30 समभागांपैकी 24 समभाग वाढीसह बंद झाले होते, तर सहा समभागांमध्ये घसरण दिसून आली होती.
Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.