Salman Khan: ‘…नाहीतर तुकाराम मुंढेंना पाठवेन!’; वांद्रेत नवीन सुरू केलेल्या कॅफेवरून सलमान खानची मैत्रिणीला गुगली

मुंबईत वांद्रे येथे आपल्या एका जवळच्या मैत्रिणीच्या नव्या कॅफेचे उद्घाटन झाल्यानंतर सलमानने तिला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
Salman Khan: ‘…नाहीतर तुकाराम मुंढेंना पाठवेन!’; वांद्रेत नवीन सुरू केलेल्या कॅफेवरून सलमान खानची मैत्रिणीला गुगली

Salman Khan Tukaram Mundhe Post: बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या हटके आणि मिश्कील शैलीसाठी नेहमीच ओळखला जातो. नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबईत वांद्रे येथे आपल्या एका जवळच्या मैत्रिणीच्या नव्या कॅफेचे उद्घाटन झाल्यानंतर सलमानने तिला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना त्याने अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा उल्लेख करत थेट कॅफेच्या स्वच्छतेवर भाष्य केले.

'इट्स डन सिस'; कॅफेच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर सलमानचा मिश्कील इशारा
कॅफेची मालकीण असलेल्या मैत्रिणीला पाठिंबा दर्शवताना सलमानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'सृष्टी, माझी कॉफी रिफिल करून दे प्लीज. कॉफीची किंमत वाढवू नकोस, अन्नाची गुणवत्ता कायम ठेव आणि मुख्य म्हणजे स्वच्छता राख, नाहीतर मी तिथे तुकाराम मुंढेंना पाठवेन आणि मग 'इट्स डन सिस'!' याशिवाय, 'एके दिवशी मी इथे बीईंग ह्युमनचा टी-शर्ट आणि जीन्स घालून नक्की येईन, तुझ्या या नवीन व्यवसायासाठी मी खूप आनंदी आहे,' असे म्हणत त्याने तिच्या नवीन प्रवासाला मनापासून शुभेच्छा दिल्या.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची धडक मोहीम अन् कडक अधिकारी प्रतिमा
महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) आपल्या कडक आणि पारदर्शक कार्यशैलीमुळे चर्चेत आहेत. राज्यभरातील रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि डेअरी आस्थापनांमध्ये स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्यांच्याकडून कठोर कारवाई केली जात आहे. अलिकडेच त्यांनी केलेल्या धडक कारवायांमध्ये 3,100 हून अधिक ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या असून, 165 परवाने निलंबित करण्यात आले आहेत तर 750 पेक्षा जास्त आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – Swara Bhaskar: स्वरा भास्कर यांची जीभ कापणाऱ्याला 1.51 लाखाचे बक्षीस जाहीर; नक्की भानगड काय?

रेस्टॉरंटमधील बनावट पनीर ओळखल्याचा तुकाराम मुंढेंचा अनुभव
अन्न सुरक्षेबाबत भाष्य करताना मुंढे यांनी नुकताच स्वतःचा एक वैयक्तिक अनुभव शेअर केला होता. एका मित्रासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले असताना तिथल्या अस्वच्छतेची आणि त्रुटींची त्यांनी पाहणी केली होती. विशेष म्हणजे मित्राने ऑर्डर केलेले पनीर बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संबंधित हॉटेल चालकाला सर्व त्रुटी दूर करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. 'अन्न सुरक्षा हा निव्वळ कायदेशीर कारवाईचा विषय नसून थेट नागरिकांच्या आरोग्याशी जोडलेला संवेदनशील मुद्दा आहे,' असे ते स्पष्टपणे मानतात.

नेटिझन्सकडून सलमानच्या विनोदी शैलीचे आणि मुंढेंच्या कामाचे कौतुक
सलमान खानच्या या मिश्कील पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका बाजूला मैत्रिणीच्या व्यवसायाला दिलेला पाठिंबा आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील एका कठोर सनदी अधिकाऱ्याच्या कामाची घेतलेली दखल, यामुळे या पोस्टने इंटरनेटवर सर्वांचे मन जिंकले आहे. एफडीएच्या धाडींचा धाक आता बॉलिवूड स्टार्सच्या गप्पांमध्येही पोहोचल्याची मजेशीर चर्चा यामुळे रंगू लागली आहे.

हेही वाचा – Madhuri Pawar : सततच्या ऑनलाईन छळाला माधुरी पवार कंटाळली; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडे ही मागणी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version