Reservation Hatao Andolan Delhi: वातावरण पुन्हा तापणार; 5.6 मिलियन फॉलोअर्सच्या ‘आरक्षण हटवा’ आंदोलनाला अखेर दिल्लीत परवानगी

कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू झालेल्या आंदोलनानंतर आता इन्स्टाग्रामवर 'आरक्षण हटवा' या मोहिमेला मोठी गती मिळाली आहे. या सोशल मीडिया मोहिमेला तब्बल 5.6 मिलियन फॉलोअर्स मिळाले आहेत.
Reservation Hatao Andolan Delhi: वातावरण पुन्हा तापणार; 5.6 मिलियन फॉलोअर्सच्या ‘आरक्षण हटवा’ आंदोलनाला अखेर दिल्लीत परवानगी

Reservation Hatao Andolan Delhi: जातीवर आधारित आरक्षणाला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आरक्षण हटवा’ आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी आखून दिलेल्या अटींसह ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले आहे. हे आंदोलन रामलीला मैदानावर होणार असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. एका वृत्तानुसार, या आंदोलनात जास्तीत जास्त 500 लोकांना एकत्र येण्याची आणि सायंकाळी 4 वाजेपर्यंतच थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे.

इन्स्टाग्रामवर ‘आरक्षण हटवा’ मोहिमेचा धुमाकूळ; 5.6 मिलियन फॉलोअर्सचा पाठिंबा
नीट (NEET) पेपरफुटीच्या घटनेनंतर देशभरातील तरुणांमध्ये असलेला प्रचंड असंतोष समोर येऊ लागला आहे. यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू झालेल्या आंदोलनानंतर आता इन्स्टाग्रामवर ‘आरक्षण हटवा’ या मोहिमेला मोठी गती मिळाली आहे. या सोशल मीडिया मोहिमेला तब्बल 5.6 मिलियन फॉलोअर्सचा पाठिंबा मिळाला असून, याच मोहिमेद्वारे तरुणांना दिल्लीत आंदोलनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते.

हेही वाचा – Attack on CJP: स्वतःच फोडल्या गाड्या, महिलांशी गैरवर्तन केलं… शाळा पाहणीदरम्यान CJP कार्यकर्ते अन् गावकऱ्यांमध्ये जुंपली

जंतर मंतरवर परवानगी नाकारली; या अटी पाळणे आवश्यक
याआधी दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलनासाठी परवानगी नाकारल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता रामलीला मैदानावर आंदोलनाची परवानगी देताना पोलिसांनी कडक अटी घातल्या आहेत.
– आंदोलनात जास्तीत जास्त 500 लोकांना एकत्र येण्याची आणि सायंकाळी 4 वाजेपर्यंतच थांबण्याची परवानगी
– आंदोलकांना कोणताही मोर्चा काढता येणार नाही
– आंदोलनस्थळी रात्रभर मुक्काम करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
– पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास हे ना हरकत प्रमाणपत्र कोणत्याही क्षणी रद्द केले जाईल, असा सज्जड इशाराही पोलिसांनी दिला आहे.

गुणवत्तेला प्राधान्य आणि समान संधीची मागणी; जात आधारित आरक्षणावर आक्षेप
जातीवर आधारित आरक्षण व्यवस्थेमुळे गुणवत्तेचे नुकसान होते आणि समाजात जातीवर आधारित भेदभाव वाढतो, असा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. या आरक्षणामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो आणि खुल्या स्पर्धेवर मर्यादा येतात, असे मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे जातीऐवजी केवळ गुणवत्तेच्या आधारावर सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, ही प्रमुख मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली जात आहे.

हेही वाचा – Influencers Govt Scheme: रील्स बनवा अन् सरकारकडून लाखो रुपये कमवा! इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची भन्नाट योजना

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version