Dhurandhar Records: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’चा देश-विदेशात धुमाकूळ!रिलीजच्या 6 व्या दिवशी हे 6 धमाकेदार रेकॉर्डस्

'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. शानदार सुरूवातीच्या वीकेंडनंतर हा चित्रपट वीकडेजमध्येही भरभरून कमाई गोळा करत आहे.
Dhurandhar Records: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’चा देश-विदेशात धुमाकूळ!रिलीजच्या 6 व्या दिवशी हे 6 धमाकेदार रेकॉर्डस्

Dhurandhar Records: अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत असलेला 'धुरंधर' (Dhurandhar) या चित्रपटाला देशात आणि जगभरात मोठा प्रेक्षकवर्ग मिळत आहे. रिलीजपूर्वी झालेल्या नकारात्मक समीक्षेसह सर्व अडचणींवर मात करत, या चित्रपटाने आपल्या उत्कृष्ट कथा आणि कलाकारांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर यश मिळवले आहे. केवळ 6 दिवसांमध्ये या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे, तसेच अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

6 व्या दिवसाची कमाई आणि जागतिक कमाई
'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar Box Office) कमाल केली आहे. शानदार सुरूवातीच्या वीकेंडनंतर हा चित्रपट वीकडेजमध्येही भरभरून कमाई गोळा करत आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनमध्ये मोठी वाढ होत आहे. सॅकनिल्कच्या (Sacnilk) आकडेवारीनुसार, या चित्रपटाने रिलीजच्या 6 व्या दिवशी 27 कोटी रुपये कमावले आहेत. यासह त्याचे एकूण कलेक्शन आता 180 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाची कामगिरी केवळ देशांतर्गत बाजारपेठेपुरती मर्यादित नसून, त्याची जगभरातील बॉक्स ऑफिसवरही धूम आहे. 6 व्या दिवसापर्यंत, 'धुरंधर'ने जगभरात 274.25 कोटींचे तगडे कलेक्शन केले आहे.

हेही वाचा – Akshaye Khanna: ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचा डान्स ओरिजिनल नाही? विनोद खन्नाच्या स्टेप्सची हुबेहुब नक्कल; Video Viral

'धुरंधर'चे 6 व्या दिवशीचे रेकॉर्ड
– 'धुरंधर'ने रिलीजच्या 6 व्या दिवशी 'रेड 2'चे लाइफटाइम कलेक्शन मागे टाकले आहे आणि तो 2025 मधील सातवा (Seventh) सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट बनला आहे.
– बॉलीवूडच्या इतिहासात पहिल्या बुधवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत याने नववे स्थान मिळवले आहे.
– 'धुरंधर'ने पहिल्या बुधवारी 27 कोटींची कमाई करत शाहरुख खानच्या 'पठाण'च्या 26.50 कोटींच्या रेकॉर्डवर मात केली आहे.
– या चित्रपटाने 'सैयारा'चे 6 दिवसांचे 153.75 कोटींच्या कमाईचे रेकॉर्डही मोडले आहे. 'धुरंधर'ची दिवसांची भारतातील एकूण कमाई 180 कोटी रुपये आहे.
– 'धुरंधर' रणवीर सिंहचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ला (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) मागे टाकून त्याचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

जागतिक रेकॉर्ड तोडले
– 'धुरंधर'ने केवळ 6 दिवसांत जगभरात 270 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. यासह त्याने अनेक मागील चित्रपटांचे वर्ल्डवाइड रेकॉर्ड उधळून लावले आहेत.
– या चित्रपटाने 'तेरे इश्क में'चे 145.5 कोटी, 'थामा'चे 187.59 कोटी, 'एक दिवाने की दिवानियत'चे 110.28 कोटी, 'सिकंदर'चे 184.89 कोटी आणि 'रेड 2'चे 237.46 कोटींच्या कलेक्शनला मागे टाकले आहे.

हेही वाचा – Dhurandhar: धुरंधरमुळे पाकिस्तानात खळबळ! ल्यारी गँगवॉरमुळे एवढा गोंधळ का उडाला?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version