धुरंधर २ चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये अजूनही कायम असतानाच हिंदी सिनेसृष्टीतील आणखी एक धमाकेदार चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने बहुप्रतिक्षित रामायण चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अभिनेता रणबीर कपूरने या चित्रपटात प्रभू श्री रामाची भूमिका साकारली असून या टीझरमध्ये यत्रतत्र सर्वत्र केवळ श्री राम पाहायला मिळत आहेत. रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूर प्रेक्षकांना चांगलाच भावला असून सोशल मीडियावर नेटकरी भरभरून त्याच कौतुक करत आहेत. रामायण हा चित्रपट दोन भागांमध्ये येणार असून त्याच्या पहिल्या भागाचा पहिला टीझर आज रिलीज झाला आहे.
नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, वरुण गोहिल, लारा दत्ता, रकुल प्रीत यांसह इतर कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. हा एक काल्पनिक चित्रपट आहे जो सतत हिंदू पौराणिक कथांमधून संदर्भ घेतो. या चित्रपटातही व्हीएफएक्सचा (VFX) प्रचंड वापर झालेला पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये रणबीर कपूरच्या भूमिकेचा प्रवास मांडला आहे.
Ramayana Teaser: Ranbir Kapoor looks majestic as Lord Rama, fans call it "out of the world" Read @ANI Story |https://t.co/eEfMOhZCW6#Ramayana #teaser #RanbirKapoor pic.twitter.com/eFcXALVqjT — ANI Digital (@ani_digital) April 2, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.