नवी दिल्ली, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भारताची चांद्रयान – ३ मोहीम यशस्वी व्हावी यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत. अनेकांचे मोहिमेकडे लक्ष आहे. या अशा वातावरणात चित्रपट अभिनेते प्रकाश राज यांनी मोहिमेची चेष्टा करणारे ट्वीट केले. या ट्वीटमुळे प्रकाश राज अडचणीत आले आहेत.
अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयान – ३ मोहिमेची चेष्टा करणारे व्यंगचित्र ट्वीट केले. यात लुंगी घातलेला माणूस एका कपातून दुसऱ्या कपात चहा ओतताना दिसत आहे. या व्यंगचित्रासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे. ‘चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने काढलेले चंद्राचे पहिले चित्र’.
प्रकाश राज यांच्या ट्वीट प्रकरणी बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीमुळे अभिनेते प्रकाश राज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
चांद्रयान – ३ बुधवारी चंद्रावर उतरणार
इसरोच्या नियोजनानुसार चांद्रयान – ३ चे लँडर बुधवार २३ ऑगस्ट रोजी सूर्यास्तानंतर चंद्रावर उतरणार आहे. वातावरण प्रतिकूल असल्यास लँडर चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया बुधवार ऐवजी रविवार २७ ऑगस्ट रोजी पार पाडली जाईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.