Jammu And Kashmir : लष्कर-ए-तोयबाच्या छुप्या संघटनेचा अनंतनागमध्ये भ्याड हल्ला; पोलिसांवर बेछुट गोळीबार, एका पोलिसाचा मृत्यू

Jammu And Kashmir : लष्कर-ए-तोयबाच्या छुप्या संघटनेचा अनंतनागमध्ये भ्याड हल्ला; पोलिसांवर बेछुट गोळीबार, एका पोलिसाचा मृत्यू

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग शहरात आज, बुधवारी संशयित दहशतवाद्यांनी पोलिसांच्या एका तुकडीवर गोळीबार केला. यामध्ये 35 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा गोळीबार दुपारी साडेबाराच्या सुमारास अनंतनाग येथील लाल चौक परिसरात झाला. ज्या पोलीस तुकडीवर हल्ला झाला. ती अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली होती. या हल्ल्यात कर्तव्यावर असलेले हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन कुरेशी यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा : SC On NEET Protest: 'आमचा वेळ वाया घालवू नका…'; जंतरमंतरवरील लाठीचार्ज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारलं

लष्कर-ए-तोयबाची एक छुप्या स्वरूपातील संघटना असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट'ने (TRF) सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दलांनी संबंधित परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. अमरनाथ यात्रा सुरू असतानाच अनंतनाग शहरात सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे गेल्या चार दिवसांपासून ही यात्रा स्थगित ठेवण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version