मुंबईसह राज्यात पोलीस बंदोबस्त

मुंबईसह राज्यात पोलीस बंदोबस्त

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : राज्याच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहा १६ आमदारांच्या अपात्रतेसह सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल लागणाल आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून ठिकठिकाणी  पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

काही क्षणात निकाल वाचनाला होणार सुरवात 

महाराष्ट्र सत्तासंघर्षाच्या सुनावणीला काही क्षणात निकाल वाचनाला सुरवात होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठ महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल जाहीर करणार आहे. खंडपीठाने एकमताने निर्णय ठरवला असून हा निकाल सरन्यायाधीस चंद्रचूड यांनी लिहिला असून थोड्याच वेळात वाचून दाखवण्यात येईल.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अर्धा तास उशीर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ११:३० वाजता निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम दिल्ली प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकालाचे वाचन करण्यात येईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version