PM Modi: ‘मन की बात’ चा 128 वा भाग आज; पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

मागील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भारतीय कॉफीची वाढती लोकप्रियता, ऑपरेशन सिंदूर आणि माओवादी हिंसेचा शेवट याचा उल्लेख केला होता.
PM Modi: ‘मन की बात’ चा 128 वा भाग आज; पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशवासीयांशी ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रमाचा 128 वा भाग असून देशभरातील नागरिक याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मोदी दर महिन्याला या रेडिओ कार्यक्रमातून समाज, संस्कृती, प्रेरणादायी कथा आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर आपल्या भावना व्यक्त करतात. याआधीच्या 127 व्या भागात मोदी यांनी भारतातील विविध राज्यांमध्ये उगवणाऱ्या कॉफीची जागतिक लोकप्रियता वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. त्यांनी कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळातील कॉफी बागानांचा उल्लेख करत भारतीय कॉफीची चव आणि गुणवत्ता जगभरात कौतुकाला पात्र ठरत असल्याचे सांगितले होते.

त्यांनी सांगितले की नॉर्थ-ईस्ट राज्यांनीही कॉफी उत्पादनात महत्त्वाची प्रगती केली आहे. मोदी यांनी कुर्ग, चिकमंगलूर, हासन, शेवरॉय, पुलनी, नीलगिरी, अन्नामलाई तथा वायनाड, त्रावणकोर आणि मालाबार या भागांमध्ये पिकणाऱ्या उच्च दर्जाच्या कॉफीचा उल्लेख केला होता. भारतीय कॉफीची विविधता आणि विशेष चव देशाची ओळख मजबूत करत असल्याचे ते म्हणाले. मागील कार्यक्रमात मोदी यांनी माओवादी हिंसाचाराच्या समाप्तीवरही भाष्य केले.

हेही वाचा: Pakistan Army: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूरची' दहशत कायम; घाबरलेल्या पाकिस्तानने बॉर्डरवरून काढला पळ

मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत सुरक्षादलांनी नक्षलवाद प्रभावित भागांत केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. जेथे कधी भीती आणि दहशतीचे वातावरण असायचे, त्या गावांत आज दिवाळीचे दिवे उजळतात, हे भारतातील बदलाचे प्रतीक असल्याचे मोदी म्हणाले. माओवादी हिंसेचा पूर्ण अंत व्हावा, अशी सामान्य जनतेची इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात मोदी यांनी कोमाराम भीम यांच्या शौर्यकथेचेही स्मरण केले. निजामांच्या अन्यायाविरोधात लढताना त्यांनी दाखवलेली धैर्यगाथा आजही प्रेरणादायी असल्याचे मोदी म्हणाले. त्या काळात निजामांविरुद्ध बोलणेही गुन्हा मानले जात असताना, कोमाराम भीम यांनी सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्याला आव्हान देत अन्यायाचा प्रतिकार केला होता. मोदी यांनी सांगितले की इतिहासातील धाडसी व्यक्तिमत्त्वांकडून तरुणांना प्रेरणा मिळते आणि देशाच्या भविष्याचे बळ वाढते. त्यांच्या विचारांची आणि धैर्याची आठवण करून त्यांनी समाजाला एकता आणि साहसाचा संदेश दिला. आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान कोणते मुद्दे मांडतील, कोणत्या प्रेरणादायी कथा सांगतील आणि देशवासीयांसाठी कोणते संदेश देतील, याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: BMC Elections 2025: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज; 11 सदस्यीय जाहीरनामा समिती जाहीर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version