Petrol Diesel Price : वाहनधारकांसाठी खुशखबर! पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

देशातील सर्वसामान्यांसाठी दिसालादायक बातमी आहे. लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण कच्च्या तेलाच्या दरात घट झाली असून त्याचा थेट फायदा नागरिकांना मिळू शकतो.
Petrol Diesel Price : वाहनधारकांसाठी खुशखबर!  पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

मुंबई : देशातील सर्वसामान्यांसाठी दिसालादायक बातमी आहे. लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण कच्च्या तेलाच्या दरात घट झाली असून त्याचा थेट फायदा नागरिकांना मिळू शकतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 64 डॉलर्स म्हणजेच 5 हजार 682 रुपये इतके झाले आहेत. गेल्या 16 आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच एवढे कमी दर नोंदवले गेले आहेत. 7 ऑक्टोबर 2024 मध्ये हे दर 81 डॉलर्स 7 हजार191 रुपये इतके होते. म्हणजेच, यंदा कच्च्या तेलाच्या किंमतीत तब्बल 17 डॉलर्सची घसरण म्हणजेच 1 हजार 509 रुपये झाली आहे. 

विशेष म्हणजे, अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प होणे आणि टॅरिफ वाढल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. याशिवाय, भारताने रशियाकडून स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाची आयात कमी झाली. सप्टेंबर महिन्यात भारताने रशियाकडून 6.05 लाख प्रति बॅरल कच्चे तेल आयात केले होते, जे ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सुमारे 32 टक्क्यांनी कमी आहे. असे सांगितले जाते की, अमेरिकेच्या दबावामुळे ही आयात कमी झाली. मात्र, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. 

हेही वाचा: Michelin India: मिशेलिनकडून भारतात पहिला ‘मेड-इन-इंडिया’ पॅसेंजर कार टायर; चेन्नई प्लांटमधून उत्पादनास सुरुवात

तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा थेट परिणार भारतीय बाजारावर होतो. जर कच्च्या तेलाचे दर आणखी कमीच राहिले, तर लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील कमी होण्याची शक्यता आहे. या घसरणीमुळे, सर्वसामान्य वाहनधारकांना मोठा दिलासा मिळू शकतो. महागाईच्या काळात इंधनाने दर कमी झाल्यामुळे घरगुती बजेटलाही काहीसा दिलासा मिळेल. त्यामुळे, सर्वांचे लक्ष आता पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या दराकडे लागले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version