Petrol Crisis : मोठ्या संकटाचा इशारा! 15 ऑगस्टपासून पेट्रोल पंप बंद होणार? अवघ्या 72 तासांचा अल्टिमेटम

देशभरातील सर्व डीलर्सशी सविस्तर चर्चा केल्यानंतर असोसिएशनने पेट्रोलच्या किरकोळ विक्रीतील आपले मार्जिन वाढवून थेट 8 टक्के करण्याची मागणी केली आहे.
Petrol Crisis : मोठ्या संकटाचा इशारा! 15 ऑगस्टपासून पेट्रोल पंप बंद होणार? अवघ्या 72 तासांचा अल्टिमेटम

Pakistan Petrol Pump Strike 2026: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच पाकिस्तान एका मोठ्या इंधन संकटाच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने (PPDA) सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अवघ्या 72 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी पहाटे 6 बजेपासून संपूर्ण देशभरातील पेट्रोल पंप अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा इशारा डीलर्सनी दिला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत एकही पेट्रोल पंप उघडला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने पाकिस्तानात हाहाकार माजण्याची शक्यता आहे.

किरकोळ विक्रीतील मार्जिन 8 टक्के करण्याची प्रमुख मागणी
पीपीडीएचे (PPDA) चेअरमन मलिक खुदा बख्श यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपाची औपचारिक घोषणा केली. सध्याच्या महागाईच्या काळात जुन्या मार्जिनवर व्यवसाय चालवणे निव्वळ अशक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. देशभरातील सर्व डीलर्सशी सविस्तर चर्चा केल्यानंतर असोसिएशनने पेट्रोलच्या किरकोळ विक्रीतील आपले मार्जिन वाढवून थेट 8 टक्के करण्याची मागणी केली आहे. या निर्णयाला असोसिएशनच्या सुमारे 14000 सदस्यांनी पूर्ण पाठिंबा दिला असून सरकारवर दबाव वाढवला आहे.

सरकारचे दोन आठवड्यांचे आश्वासन हवेतच विरले
डीलर्स असोसिएशनच्या नेत्यांनी 7 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित समस्या मांडल्या होत्या. त्या वेळी देशभरातील प्रस्तावित संप मागे घेण्याची विनंती करत, पुढील 2 आठवड्यांच्या आत सर्व समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आणि दिलेला शब्द न पाळल्याने डीलर्सचा संयम सुटला असून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा – Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निधन? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

'डेली प्राइस मॅकेनिज्म' आणि वाढत्या महागाईचा दुहेरी फटका
पेट्रोल पंप चालकांची सर्वात मोठी अडचण ही पाकिस्तान सरकारच्या 'डेली प्राइस मॅकेनिज्म' (दररोजच्या किमती बदलण्याची पद्धत) व्यवस्थेमुळे निर्माण झाली आहे. इंधनाचे दर दररोज बदलत असल्याने पंप चालकांना त्यांच्या जुन्या साठ्यावर (Stock) मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. याशिवाय वीज आणि गॅसचे वाढलेले बिल, कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन आणि दैनंदिन व्यवस्थापनाचा खर्च यांमुळे सध्या मिळणारे कमिशन तोकडे पडत आहे.

संपाचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होण्याचा धोका
आता पाकिस्तान सरकारकडे तोडगा काढण्यासाठी अवघे 72 तास शिल्लक राहिले आहेत. जर 15 ऑगस्ट रोजी पहाटे 6 वाजेपर्यंत सरकार आणि डीलर्स यांच्यात तडजोड झाली नाही, तर पाकिस्तानातील सार्वजनिक वाहतूक, मालवाहतूक आणि सामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे ठप्प होईल. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानी जनतेला आता या नव्या इंधन आणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा – Donald Trump : आंतरराष्ट्रीय पातळीवरची मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांचा थोडक्यात बचावला जीव?, नेमकं काय झालं?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version