मलकापूर : सातारा जिल्यातील कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील शास्त्रीनगर येथे भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी एका मुलीवर हल्ला केला. रस्त्यावर चालत असताना एकाचवेळी 6 ते 7 कुत्र्यांनी हल्ला केल्याने मुलगी घाबरलेली पहायला मिळाली. यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने मुलीचा जीव वाचला. मात्र यामुळे मलकापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर नगरसेवक नितीन काशिद यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मलकापूर नगरपरिषदेचे नगरसेवक नितीन काशिद यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.