मुख्यमंत्र्यांची एकच कॅसेट वाजते – खडसे

मुख्यमंत्र्यांची एकच कॅसेट वाजते –  खडसे

‘मुख्यमंत्र्यांची एकच कॅसेट सारखी वाजतेय’ अशी टीका एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव दौऱ्यावर केली आहे.

‘जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन वेळा आले, तीन वेळा सभेत भाषण करताना त्यांनी शिवसेनेतून बाहेर कसे पडलो, गुवाहाटीला कसे गेलो, हीच कॅसेट वाजवली’ अशी टीका करत एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी काहीतरी देतील अशी अपेक्षा होती मात्र ते देऊ शकले नाहीत, जिल्ह्यातले अनेक प्रश्न प्रलंबित असताना, दुसरीकडे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही कर्जमाफीची सुद्धा अंमलबजावणी झालेली नाही, पिक विमा कंपनीचीही बोंबाबोंब सुरू आहे, एकंदरीतच शेतकरी मोठ्या अडचणीत असताना त्यावर काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. सभेत विकासावर कुठल्याच पद्धतीने चर्चा झाली नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करताना कुठल्याही पद्धतीने आचारसंहितेची अडचण नव्हती, मात्र त्याकडे एकनाथ शिंदेंनी दुर्लक्ष केलं, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.

 

अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version