कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेल्टा व्हेरियन्ट व्हायरस मुळे ठाणे जिल्हा हा तिसऱ्या लेव्हल मध्ये पुन्हा जैसे थे प्रमाणे आला आहे.. त्यामुळे शासनाकडून कडक निर्बंध लादले आहे .. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटन स्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.. त्यामुळे ठाण्यालगत असणारे मुंब्रा देवी डोंगराच्या बाजूला असणारा धरण,तलाव ,नदी पात्र ,ओढे आणि धबधब्यावर मुंब्रा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे .
मागील आठवड्यात विकेंड मध्ये पिकनिक स्पॉट म्हणून अनेक पर्यटन स्थळी मौज मजा करण्यासाठी येत असतात त्यामुळे अशा भागात गर्दी होऊन कोरोनाला आव्हान देण्याच काम पर्यटन प्रेमी करत असल्याने पोलिसांनी या ठिकाणी नागरिकांना पळवून लावले आहे .. त्याच बरोबर जमाव बंदी ची कारवाई देखील करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे .
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.