Nepal flood: नेपाळमधील भीषण दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमागे हे कारण? ‘HiRISK’ अहवालातून धक्कादायक माहिती उघड

नेपाळमधील भीषण दुर्घटनेबाबत समोर आलेल्या एका ताज्या अहवालात धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
Nepal flood: नेपाळमधील भीषण दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमागे हे कारण? ‘HiRISK’ अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Nepal flood after Glacier Collapse: नेपाळमधील हिमनदी कोसळून आलेल्या विनाशकारी महापुरात 1,127 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 'हायरिस्क' (HiRISK) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक Consortium च्या ताज्या अहवालात या आपत्तीबाबत एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. दुर्घटनेच्या काही दिवस आधीच उपग्रहांद्वारे मिळालेल्या छायाचित्रांमध्ये हिमनदी वितळून येणारे पाणी स्पष्टपणे तपकिरी झाल्याचे आणि पर्वताच्या खडकाळ उतारांवर मोठ्या भेगा पसरत असल्याचे 'प्री-इव्हेंट इंडिकेशन्स' (Pre-event indications) दिसून आले होते

पूर्वसूचना यंत्रणेच्या अभावामुळे शेकडो निष्पापांचे गेले प्राण
दुर्गम आणि अत्यंत उंचावरील वातावरणात असे बदल वेळेत ओळखणे कठीण असले तरी, योग्य यंत्रणा असती तर जीवितहानी टाळता आली असती, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. चीनमधील काही हिमनदी तलावांवर देखरेख ठेवण्यासाठी पूर्वसूचना यंत्रणा कार्यरत होत्या, परंतु या दुर्घटनाग्रस्त भागात प्रत्यक्ष हिमनद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी कोणतीही सक्रिय यंत्रणा नव्हती. जर नदीच्या खालच्या भागात किमान 10 मिनिटे आधी इशारा देणारी व्यापक यंत्रणा असती, तर मोठ्या संख्येने लोकांचे प्राण वाचू शकले असते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

विविध जिल्ह्यांमध्ये हाहाकार; मृतांची संख्या 1,127 वर
नेपाळ पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार या भीषण आपत्तीतील मृतांचा आकडा 1,127 वर पोहोचला आहे. यामध्ये चितवन येथून 348, नवलपरासी पूर्व येथून 217, नवलपरासी पश्चिम येथून 190, नुवाकोटमधून 155, गोर्खा येथून 66, धाडिंगमधून 59, रसुवा येथून 45 आणि तनहून येथून 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय भारतातही 9 मृतदेह सापडले असून आतापर्यंत केवळ 95 मृतदेहांची ओळख पटू शकली आहे.

हेही वाचा – हिमाचलवर नेपाळसारख्या जलप्रलयाचं सावट; IIT च्या अभ्यासातून 9 हिमनदी-सरोवरांचा मोठा धोका उघड

हिमालयातील आपत्ती रोखण्यासाठी भारत, नेपाळ अन् चीन सहकार्याची गरज
या भीषण दुर्घटनेनंतर हिमालयीन क्षेत्रातील नैसर्गिक धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीमापार माहितीची देवाणघेवाण अत्यंत महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मे महिन्यातच चीन आणि नेपाळच्या अधिकाऱ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन सहकार्याबाबत बैठक झाली होती. हिमनदीच्या तलावांसोबतच अस्थिर हिमनद्या आणि सभोवतालच्या पर्वतीय उतारांवर चोवीस तास लक्ष ठेवू शकणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

बचावकार्य सुरूच; बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे आव्हान
नेपाळमधील चिलिमे आणि लांगटांग बोगद्यांच्या परिसरात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणि बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य वेगाने राबवले जात असले तरी हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे अडथळे येत आहेत. या आपत्तीमुळे संपूर्ण हिमालयीन परिसरातील हवामान बदलांचे आणि हिमनद्या वितळण्याचे गंभीर धोके पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत.

हेही वाचा –  Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचा हाहाकार! एकाच घरात सापडले तब्बल 23 मृतदेह; आईच्या कुशीत लेकीने सोडले प्राण

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version