धनुष्यबाण चिन्हाची सोमवारची सुनावणी रद्द

धनुष्यबाण चिन्हाची सोमवारची सुनावणी रद्द

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे गट शिवसेनेचे निर्माण झाले. ६८ वर्षांच्या इतिहासात शिवसेनेने एवढा मोठा सत्ता संघर्ष अनुभवाला नव्हता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपसोबत गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळालं. सोबत निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना हे नाव धनुष्यबान हे अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं.

परंतु या निर्णयाविरुद्ध आणि खरी शिवसेना कोणाची यासंदर्भातील याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या दहा महिन्याच्या काळात सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय न्यायाच्या अंतिम टप्प्यात पोहचले आहे. या याचेकीची सुनावणी सोमवारी होणार होती परंतु सुप्रीम कोर्टाच्या सोमवारच्या कामकाजा शिवसेनेच्या प्रकरणाचा समावेश नसल्याने धनुष्यबाण चिन्ह संदर्भातील सुनावणी ची पुढची तारीख लवकरच जाहीर होईल असं सांगितलं जातंय.

सत्ता संघर्षाच्या निकालाकडे महाराष्ट्र सोबतच अवघ्या देशाचे लक्ष लागलं आहे. सोबतच शिवसेना निवडणूक चिन्हाचे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सत्ता संघर्षाच्या सुनावणीसाठी २४ ही तारीख अंतिम ठरली होती. परंतु तारीख पुढे ढकलून उद्या सोमवारची तारीख देण्यात आली होती. परंतु आता उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीमध्ये शिवसेना नाव आणि अधिकृत चिन्हाच्या प्रकरणाचा समावेश नसल्याचे समोर आले आहे.

मागील दहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या काळात विविध कागदपत्रांची पूर्तता दोन्ही गटाकडून करण्यात आली. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालय निकालाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचल आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version