सावरकरांचा जन्मदिन ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’

सावरकरांचा जन्मदिन ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’

महाराष्ट्रात २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा करावा, अशी मागणी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यानंतर आता, हा दिवस राज्य शासनातर्फे स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र शिंदे यांनी ट्विटद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट केले की, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. सावरकर यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतशील विचारांना पुढे नेण्यासाठी स्वातंत्र्यवीर गौरव दिन साजरी करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version