अहमदाबाद : इंडिगोच्या लखनौ-दम्मम विमानातील एका चिठ्ठीवर ‘बॉम्ब’ असा मजकूर आढळल्याने गुरुवारी त्या विमानाला अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एका कर्मचाऱ्याला कागदाच्या तुकड्यावर ‘बॉम्ब’ असे लिहिलेले आढळले. त्यानंतर 107 प्रवासी आणि सहा कर्मचारी असलेल्या या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंडिगोचे विमान 6E 97 सायंकाळी 5.40 वाजता अहमदाबाद विमानतळावर सुरक्षितपणे उतरले असून, नियमावलीनुसार सुरक्षा तपासणी सुरू आहे. अहमदाबादहून पर्यायी विमान (रिकव्हरी फ्लाईट) रात्री साधारण 8.30 वाजता उड्डाण करण्याची शक्यता आहे.
Gujarat | Ahmedabad Police say, "Lucknow-Dammam 6E 97 IndiGo flight made an emergency landing in Ahmedabad after a bomb threat onboard. A member of the crew had found 'Bomb' written on a piece of paper. There are 107 passengers and 6 crew membes onboard, all of them are safe at… — ANI (@ANI) September 10, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.