Donald Trump Warning: ‘रशियासोबत व्यापार केला, तर…’; ट्रम्प यांचा जगभरातील देशांना कडक इशारा

दरम्यान, ट्रम्प यांनी अधिक कठोरपणे सांगितले की, “रशियासोबत व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशावर अत्यंत कठोर निर्बंध लादले जातील. यात इराणचाही समावेश होऊ शकतो.”
Donald Trump Warning: ‘रशियासोबत व्यापार केला, तर…’; ट्रम्प यांचा जगभरातील देशांना कडक इशारा

Donald Trump Warning: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांना मोठी धमकी देत स्पष्ट संदेश दिला आहे की रशियासोबत व्यापार करणाऱ्या कोणत्याही राष्ट्रावर कठोर निर्बंध लादले जातील. मॉस्कोवर दबाव वाढवण्यासाठी त्यांचे प्रशासन आणि रिपब्लिकन नेते कठोर कायद्यांवर काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. रशिया आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर अतिरिक्त दबाव आणण्यासाठी काँग्रेस उपाययोजना करणार का, असा प्रश्न विचारला असता ट्रम्प म्हणाले, “होय, मी ऐकले आहे की ते असे करत आहेत, आणि मला त्यात काहीच हरकत नाही.”

ट्रम्प यांची थेट धमकी

दरम्यान, ट्रम्प यांनी अधिक कठोरपणे सांगितले की, “रशियासोबत व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशावर अत्यंत कठोर निर्बंध लादले जातील. यात इराणचाही समावेश होऊ शकतो.” त्यांनी पुन्हा एकदा जोर देऊन हे विधान केले, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली.  

हेही वाचा – Masood Azhar Claim: 'मी मस्क-झुकरबर्गपेक्षाही श्रीमंत…'; मसूद अझहरचा दावा

भारतावर लादला 50 टक्के कर 

ट्रम्प प्रशासनाने भारतावर 50 कर लादला आहे, जो जगातील सर्वाधिक करांपैकी एक आहे. यामध्ये रशियन तेल खरेदीवरचा अतिरिक्त 25 टक्के कर देखील आहे. याशिवाय, अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर झालेल्या नवीन विधेयकात रशियन तेलाच्या खरेदी आणि विक्रीवर 500 टक्के कर लादण्याचा प्रस्ताव आहे. हाऊस फॉरेन रिलेशन्स कमिटीमध्ये हा प्रस्ताव जवळजवळ एकमताने मंजूर झाला आहे.

हेही वाचा – Sheikh Hasina's on Death Sentence: 'माझी बाजू न ऐकताचं….'; फाशीच्या शिक्षेवर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया

तथापी, काँग्रेस सदस्य लिंडसे ग्रॅहम आणि रिचर्ड ब्लूमेंथल यांनी “रशिया सॅंक्शन्स अ‍ॅक्ट 2025” सादर केला आहे, ज्याद्वारे युक्रेनमधील युद्धाला आर्थिक पाठबळ देणाऱ्या देशांवर प्रचंड निर्बंध आणि कर लादण्याचा उद्देश आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version