Gold-Silver Rates Toaday: आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 11 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशांतर्गत परिस्थितीमुळे जून महिन्यात सोन्याची आयात आणि मागणी मंदावली असली, तरी स्थानिक बाजारात भाव वेगाने वाढले आहेत. गेल्या 8 दिवसांत सोन्याच्या भावात तब्बल 10,000 रुपयांची भर पडली आहे, तर आठवड्याभरात चांदी 15,000 रुपयांनी महागली आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1,53,860 रुपयांची पातळी गाठली आहे, तर चांदीचा दर 2,36,320 रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचला आहे.
आजचे 24 कॅरेट आणि 22 कॅरेटचे ताजे दर
आज सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 3,160 रुपयांनी तर प्रति ग्रॅम 316 रुपयांनी वधारला आहे. बाजारातील विविध शुद्धतेनुसार आणि प्रमुख शहरांनुसार सोन्याचे भाव खालीलप्रमाणे आहेत:
– 24 कॅरेट सोने (प्रति 10 ग्रॅम): 1,53,860 रुपये
– 22 कॅरेट सोने (प्रति 10 ग्रॅम): 1,41,038 रुपये
– दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोने (मेकिंग चार्जेस व GST सह): 1,64,042 रुपये प्रति तोळा (अंदाजे)
– मुंबई: 24 कॅरेट – 1,53,790 रुपये, 22 कॅरेट – 1,40,974 रुपये
– दिल्ली: 24 कॅरेट – 1,53,530 रुपये, 22 कॅरेट – 1,40,736 रुपये
– बेंगळुरू: 24 कॅरेट – 1,53,950 रुपये, 22 कॅरेट – 1,41,121 रुपये
– कोलकाता: 24 कॅरेट – 1,53,630 रुपये, 22 कॅरेट – 1,40,828 रुपये
– हैदराबाद: 24 कॅरेट – 1,54,070 रुपये, 22 कॅरेट – 1,41,231 रुपये
गेल्या 40 दिवसांतील सोन्याच्या दरांची आकडेवारी
ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या भावात 11,000 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्याचा विचार केला तर सोने 1,44,000 रुपयांवरून थेट 11,000 रुपयांनी महागले आहे. 1 जुलै रोजी सोने 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 1,40,780 रुपयांना विकले जात होते. त्या तुलनेत अवघ्या 40 दिवसांत सोन्याच्या दरात 12,000 रुपयांची मोठी वाढ झाली असून आजचा भाव त्याच्या सर्वोच्च उच्चांकापासून केवळ 25,000 रुपयांनी स्वस्त आहे.
चांदीच्या दरातील तेजी अन् एमसीएक्स (MCX) मधील स्थिती
सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही मोठी तेजी दिसून येत आहे. गेल्या 3 दिवसांनंतर आज चांदी 10,000 रुपयांनी महाग झाली असून किरकोळ बाजारात प्रति किलो 2,55,000 रुपयांना विकली जात आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गेल्या 7 ट्रेडिंग दिवसांमध्ये चांदीचा भाव प्रति किलो 24,000 रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे, तर सोन्यात 12,000 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. 31 जुलै रोजी MCX वर 1 किलो चांदी 2,17,198 रुपयांवर बंद झाली होती, जी वाढून मंगळवारी बाजाराच्या सुरुवातीला 2,41,999 रुपये प्रति किलोवर पोहोचली.
सोन्याचे दागिने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
किरकोळ बाजारात सोन्याची खरेदी प्रामुख्याने 24 कॅरेट आणि 22 कॅरेट या दोन प्रकारांत केली जाते. 24 कॅरेट सोने हे 100 टक्के शुद्ध मानले जात असल्यामुळे ते अत्यंत मऊ असते आणि त्यापासून थेट दागिने बनवणे कठीण असते. त्यामुळे सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याला प्राधान्य दिले जाते. 22 कॅरेट सोन्यात तांबे किंवा इतर धातूंचे मिश्रण केले जात असल्याने दागिन्यांना योग्य टणकपणा आणि टिकाऊपणा मिळतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.