Gold-Silver Rate: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! 29 ऑगस्टचे शहरांनुसार 24, 22 अन् 18 कॅरेटचे नवीन भाव काय?

सलग तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत असून 29 ऑगस्ट रोजी बाजारातील व्यवहारांना सुरुवात होताच सोन्याचे दर आणखी खाली आले.
Gold-Silver Rate: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! 29 ऑगस्टचे शहरांनुसार 24, 22 अन् 18 कॅरेटचे नवीन भाव काय?

Gold-Silver Rates 29 August 2026: सण-उत्सवांचे दिवस जवळ येत असतानाच सराफा बाजारातून खरेदीदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सलग तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत असून 29 ऑगस्ट रोजी बाजारातील व्यवहारांना सुरुवात होताच सोन्याचे दर आणखी खाली आले. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम (1 तोळा) दरात तब्बल 2,890 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. याबरोबरच 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम दरात 2,650 रुपये तर 18 कॅरेटच्या दरात 2,170 रुपयांची घट झाली आहे.

विविध शहरांतील सोन्याचे ताजे दर
गुडरिटर्न्सने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख शहरांमध्ये 1 ग्रॅम आणि 10 ग्रॅम सोन्याचे भाव खालीलप्रमाणे आहेत:
– सध्या मुंबई व पुण्यात 24K सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,58,249 रुपये आहे. तर, 22K चा दर प्रति 10 ग्रॅम 1,45,050 रुपये आहे. तसेच, 18K चा दर प्रति 10 ग्रॅम 1,18,680 रुपये आहे.
– दिल्लीत 24K सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,58,390 रुपये आहे. तर, 22K चा दर प्रति 10 ग्रॅम 1,45,200 रुपये आहे. तसेच, 18K चा दर प्रति 10 ग्रॅम 1,18,830 रुपये आहे.
– नागपूर व बंगळुरूत 24K सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,58,240 रुपये आहे. तर, 22K चा दर प्रति 10 ग्रॅम 1,45,050 रुपये आहे. तसेच, 18K चा दर प्रति 10 ग्रॅम 1,18,680 रुपये आहे.
– नाशिकमध्ये 24K सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,58,270 रुपये आहे. तर, 22K चा दर प्रति 10 ग्रॅम 1,45,080 रुपये आहे. तसेच, 18K चा दर प्रति 10 ग्रॅम 1,18,710 रुपये आहे.

चांदीच्या दरात एकाच दिवसात 5,000 रुपयांची प्रचंड घट
सोन्यापाठोपाठ चांदीच्या बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. देशांतर्गत बाजारात 1 किलो चांदीचा भाव 5,000 रुपयांनी कमी होऊन 2,45,500 रुपये प्रति किलोवर आला आहे. आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चांदीचा दर 2,50,500 रुपये प्रति किलो नोंदवला गेला होता. केवळ एकाच दिवसात झालेली ही मोठी घट दागिने आणि वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानली जात आहे.

हेही वाचा – Sugar Price Drop: ग्राहकांना मोठा दिलासा! साखरेचे भाव तब्बल 20 टक्क्यांनी घसरले; कारवाईनंतर साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले

खरेदीदारांसाठी उत्तम संधी
गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीचे दर उच्चांकी पातळी गाठत असल्यामुळे सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिशावर मोठा ताण पडत होता. मात्र, सणांच्या काळात झालेली ही घसरण आणि किमतींमधील सातत्यपूर्ण घट यामुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा गर्दी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मजबूत डॉलरचा सोन्यावर दबाव
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकी डॉलरमध्ये झालेली मजबुती सोन्याच्या दरातील घसरणीचं प्रमुख कारण आहे. डॉलरचा निर्देशांक 99.15 च्या पातळीवर गेला असून, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. याशिवाय अलीकडे सोन्याच्या दरात झालेल्या तेजीमुळे व्यापारी सलग तिसऱ्या दिवशी नफावसुली करत आहेत. त्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे.

कस्टम ड्युटी कपातीच्या चर्चेचाही परिणाम
देशांतर्गत बाजारात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्याच्या चर्चेचा परिणामही किमतीवर झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. वाढत्या सोन्याच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर सरकार कस्टम ड्युटीमध्ये कपात करू शकते, अशा चर्चा बाजारात सुरू आहेत.

हेही वाचा – Bank Holiday September 2026: संप आणि सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवांवर मोठा परिणाम; तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद!

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version