Gold Rates Today: सोने-चांदीचे भाव कडाडले! पाहा 4 सप्टेंबरचे प्रमुख शहरांमधील ताजे दर

वर्ष 2026 च्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सलग तीन दिवस घसरण झाल्यानंतर अखेर देशांतर्गत सराफा बाजारात आज तेजी पाहायला मिळत आहे.<br/>
Gold Rates Today: सोने-चांदीचे भाव कडाडले! पाहा 4 सप्टेंबरचे प्रमुख शहरांमधील ताजे दर

Gold Rates Today 4 September: सलग तीन दिवस घसरण झाल्यानंतर अखेर देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, 4 सप्टेंबर 2026 रोजी सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम मागे 2757 रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. या वाढीमुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.54 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, चांदीच्या दरातही प्रति किलो 4137 रुपयांची मोठी वाढ झाली असून, चांदीचा दर 2,32,533 रुपयांवर पोहोचला आहे.

सोन्याने ओलांडला 1.54 लाखांचा टप्पा
वर्ष 2026 च्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 31 डिसेंबर 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.33 लाख रुपये इतका होता. मात्र, गेल्या 8 ते 9 महिन्यांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 21,000 रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. अशाच प्रकारे, 31 डिसेंबर 2025 रोजी 2.30 लाख रुपये प्रतिकिलो असणारी चांदी आता वाढून 2.33 लाख रुपयांवर पोहोचली आहे.

हेही वाचा – Robert Kiyosaki: ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र…’ जगाला श्रीमंत होण्याचे धडे देणारे रॉबर्ट कियोसाकीच कर्जाच्या विळख्यात; लेखक अडचणीत कसे सापडले?

24 आणि 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर
IBJA ने जाहीर केलेल्या ताज्या दरांनुसार, शुक्रवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,53,325 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. आगामी सण आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झालेली ही अचानक वाढ खरेदीदारांच्या खिशाला महाग पडणारी ठरत आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीची स्थिती
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर स्थिर आणि समान पातळीवर पाहायला मिळत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या सर्व प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,53,941 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तसेच, राज्यभरात आज 1 किलो चांदीचा दर 2,32,533 रुपये नोंदवला गेला आहे.

हेही वाचा – Fake Currency Racket: झटपट पैशांसाठी डोकं चालवलं.. घरातच सुरू केली नोटांची छपाई; झोमॅटो डिलिव्हरी बॉय, रॅपिडो चालकाच्या रॅकेटचा भांडाफोड

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version