BJP MLA Car Wash Video : बडे लोग बडे शौक! गाडी धुण्यासाठी मागवला चक्क अग्निशमन दलाचा बंब; भाजप आमदाराचा प्रताप कॅमेऱ्यात कैद

आपात्कालीन मदतीसाठी बनवलेल्या अग्निशमन यंत्रणेचा असा गैरवापर नेमका कोणाच्या आदेशाने झाला, याबद्दल तीव्र आक्षेप घेतले जात आहेत.
BJP MLA Car Wash Video : बडे लोग बडे शौक! गाडी धुण्यासाठी मागवला चक्क अग्निशमन दलाचा बंब; भाजप आमदाराचा प्रताप कॅमेऱ्यात कैद

Fire Brigade Washed BJP MLA Car, Video Viral: मध्य प्रदेशातील सिंगरौली येथील भाजप आमदार रामनिवास शाह यांच्या शासकीय निवासाबाहेरचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने प्रसारित होत आहे. बिलौंजी परिसरातील या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या एका खासगी इनोव्हा कारवर अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या प्रेशर पाईपने पाणी फवारताना दिसत आहेत. आपत्कालीन सेवांसाठी राखीव असलेल्या पाण्याचा आणि अग्निशमन दलाच्या गाडीचा वापर अशा प्रकारे खासगी वाहन धुण्यासाठी केल्याचे समोर आल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शासकीय निवासस्थानाबाहेर अग्निशमन दलाने धुतली भाजप आमदाराची कार
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, आमदारांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या इनोव्हा गाडीभोवती अग्निशमन दलाचे 3 कर्मचारी तैनात असल्याचे स्पष्ट दिसते. ते जवान गाडी स्वच्छ करण्यासाठी बंबामधून पाण्याचा मोठा मारा करत आहेत. ही इनोव्हा कार खुद्द आमदार रामनिवास शाह यांच्याच मालकीची असल्याचे सांगण्यात आले आहे. आपात्कालीन मदतीसाठी बनवलेल्या अग्निशमन यंत्रणेचा असा गैरवापर नेमका कोणाच्या आदेशाने झाला, याबद्दल तीव्र आक्षेप घेतले जात आहेत.

हेही वाचा – PM Narendra Modi Health : “मोदींची प्रकृती बरी नाही, देशहितासाठी…” मोदींच्या प्रकृतीवर या नेत्याचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले? 

अग्निशमन बंब बोलवण्यामागे कोणाचा आदेश? स्पष्टीकरण अद्याप अस्पष्ट
हा शासकीय अग्निशमन बंब आमदाराच्या निवासस्थानी नक्की का आला होता, तो तिथे कोणी मागवला होता आणि कोणत्या अधिकाऱ्याच्या सूचनेवरून गाड्या धुण्याचे काम सुरू होते, याप्रश्नी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांचा वापर आमदाराच्या वैयक्तिक कामासाठी कसा काय केला गेला, यावरून पालिका व पोलीस प्रशासनाच्या कारभारावरही शंका उपस्थित केली जात आहे.

नेटकऱ्यांची तीव्र टीका आणि राजकीय चर्चांना उधाण
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या या वर्तनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सरकारी मालमत्ता आणि सार्वजनिक साधनांचा वैयक्तिक कामासाठी असा उघड गैरवापर होणे अयोग्य असल्याची टीका युजर्स करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर संबंधित आमदार रामनिवास शाह किंवा संबंधित नगरनिगम प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया जारी करण्यात आलेली नाही.

हेही वाचा – Khan Sir Controversy: ‘ते मला संपवू शकतात…’; खान सरांविरोधात महिलेची तक्रार; FIR दाखल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version