मराठी अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आतापर्यंत त्याच्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे.अशातच आता तो त्याच्या एका नविन चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्री काजल अग्रवालसोबत तो आता 'द इंडिया स्टोरी' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये भारतातील काही मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
समोर आलेल्या टीझरमध्ये श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल एका कोर्टात दिसून येत आहेत. यामध्ये कीटकनाशक शेतीमागील भयावह वास्तव उघड करताना दिसतात. दैनंदिन आहारातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषारी रसायनांमुळे, विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यावर निर्माण होणाऱ्या धोक्यांवर यात प्रकाश टाकण्यात आला आहे.
हेही वाचा – Prahar Movie: मराठीचा चॉकलेट हिरो बनणार अजमल कसाब!; 'प्रहार'च्या टिजरने चाहत्यांना दिला मोठा धक्का
भावनिक आणि सामाजिक आशय असलेल्या कथेद्वारे, अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या पण दूरगामी परिणाम करणाऱ्या या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा चित्रपट प्रयत्न करतो. झी स्टुडिओज आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत 'द इंडिया स्टोरी'चे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे.
भावनिक आणि सामाजिक आशय असलेल्या कथेद्वारे, अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या पण दूरगामी परिणाम करणाऱ्या या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा चित्रपट प्रयत्न करतो. हा चित्रपट 24 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.