14 नोव्हेंबर हा भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र आता बालदिनाची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनोज तिवारी यांनी बालदिनाची तारीख बदलण्यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. यामध्ये 14 नोव्हेंबरऐवजी 26 डिसेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. 26 डिसोंबर रोजी बालदिन साजरा करण्यामागे फार मोठं ऐतिहासिक कारण आहे.
काय घडलं होतं 26 डिसेंबर रोजी?
शिखांचे दहावे गुरू गोबिंद सिंग यांचे लहान पुत्र साहेबजादे झोरावर सिंग आणि फतेह सिंग यांनी धर्मरक्षणासाठी 26 डिसेंबर 1705 रोजी बलिदान दिलं होतं.
त्यांचं हे बलिदान लोकांच्या स्मृतीत राहावं आणि लहानग्यांना त्यापासून बोध मिळावा, या हेतूने बालदिन 26 डिसेंबर रोजी साजरा व्हावा अशी मागणी तिवार यांनी केली आहे.
भाजपाचा नेहरूंना होणारा विरोध लक्षात घेता या मागणीचा विचार होण्याची शक्यता आहे. तसंच मनोज तिवारी हे भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही मानले जात आहेत. या पार्श्वभूमीवर तिवारी यांच्या मागणीवर सरकार काय निर्णय घेतलं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या संदर्भात काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता, भाजपकडे बहुमत आहे, ते हवा तो निर्णय घेऊ शकतात, असं मत त्यांनी जय महाराष्ट्रला दिली
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.