चुलबंद नदीच्या पाण्यात अडकली क्रेन

चुलबंद नदीच्या पाण्यात अडकली क्रेन

गेल्या सहा महिन्यांपासून चुलबंद नदीवरील पूल बांधकामासाठी वापरण्यात येत असलेली क्रेन मशीन मागील २ दिवसांपासून झालेल्या पावसाने नदीला आलेल्या पुरात अडकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २७ जून रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सोनी आवळी चुलबंद नदीपात्रात उघडकीस आली.

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी आवळी गावातून वाहणाऱ्या चुलबंध नदीवर पूल बांधकामासाठी वापरण्यात येत असलेली क्रेन मशीन मागील दोन दिवसांपासून नदीला आलेल्या पुरात अडकली. दोन दिवसांपासून तालुक्यात दमदार पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले असतानाच चुलबंद नदीच्या पाण्यात देखील अचानक वाढ झाली आहे. पूल बांधकामासाठी वापरात असलेली क्रेन मशीन नदीपात्रात उभी असताना अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने क्रेन मशीन अडकली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version