Ethanol vs Petrol: ‘आता तुम्हीच ठरवा, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात..’; भाजप खासदाराने दाखवला इथेनॉल अन् पेट्रोलचा लाइव्ह प्रयोग

E20 इंधनाबाबत पसरवल्या जाणाऱ्या कथित अफवांना पूर्ण विराम देण्यासाठी खासदार रेड्डी यांनी थेट प्रयोग करून इथेनॉलचे पर्यावरणासाठी आणि देशासाठी असणारे फायदे पटवून दिले आहेत.
Ethanol vs Petrol: ‘आता तुम्हीच ठरवा, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात..’; भाजप खासदाराने दाखवला इथेनॉल अन् पेट्रोलचा लाइव्ह प्रयोग

E20 Petrol Ethanol Blend Experiment: देशभरात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित (E20) इंधनाच्या वापरावरून वाहनचालकांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत असून गाड्यांचे मायलेज घटत असल्याच्या आणि इंजिनचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपचे अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून तेलंगणातील चेवेल्ला मतदारसंघाचे खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांचा एक अनोखा आणि प्रात्यक्षिक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. E20 इंधनाबाबत पसरवल्या जाणाऱ्या कथित अफवांना पूर्ण विराम देण्यासाठी त्यांनी थेट प्रयोग करून इथेनॉलचे पर्यावरणासाठी आणि देशासाठी असणारे फायदे पटवून दिले आहेत.  

दोन्ही इंधनांना लावली आग; धूर अन् काजळीचा स्पष्ट फरक उघड  
व्हिडिओमध्ये खासदार रेड्डी यांच्यासमोर दोन वेगवेगळ्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. एका बाटलीत अमेरिका व मध्य पूर्वेकडील देशांमधून आयात केलेले 100 टक्के शुद्ध पेट्रोल होते, तर दुसऱ्या बाटलीत भारतीय शेतकऱ्यांच्या धान्यापासून तयार करण्यात आलेले शुद्ध इथेनॉल होते. खासदारांनी दोन्ही द्रव स्टीलच्या दोन वाट्यांमध्ये काढून पेटवून दिले. पेट्रोल मोठ्या मशालींसारख्या काळ्या ज्वाळांसह वेगाने जळू लागले आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर काळा धूर निघू लागला, तर इथेनॉल शांत व कमी ज्वाळांसह कोणतीही
काजळी न सोडता स्वच्छ जळताना दिसले.

हेही वाचा – Parliament Adjourned: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचा गोंधळ; अमित शाह यांच्या निवेदनाआधीच लोकसभेचं कामकाज तहकूब, नेमकं काय घडलं?

टिशू पेपर चाचणी अन् ‘काजळी विरहित’ इंधनाचा दावा  
ज्वलन प्रक्रिया संपल्यानंतर पेट्रोलची वाटी पूर्णपणे काळी पडली होती आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर कार्बन बाहेर पडला होता, तर दुसरीकडे इथेनॉलची वाटी अत्यंत स्वच्छ आणि पांढरीशुभ्र राहिली होती. टिशू पेपरने दोन्ही वाट्या पुसून दाखवत खासदार म्हणाले की, “इथेनॉलमुळे दहन प्रक्रिया स्वच्छ होते आणि प्रदूषण कमालीचे कमी होते. त्यामुळे पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉल मिश्रण हे आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर आहे.’ 

‘तुम्ही कोणाच्या बाजूने आहात?’; खासदारांचा वाहनचालकांना थेट सवाल
प्रयोगाअंती खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी देशातील नागरिकांना एक थेट आणि भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, ‘तुम्हीच ठरवा तुम्ही कोणाच्या बाजूने उभे आहात? अमेरिका आणि मध्य पूर्वेकडून (मिडल ईस्ट) आयात केलेल्या तेलाच्या बाजूने, की भारतातील शेतकरी आणि आपल्या स्वदेशी उद्योगांच्या बाजूने?’ E20 पेट्रोलच्या वापरामुळे देशाचे अब्जावधी रुपयांचे परकीय चलन वाचत असल्याचे आणि स्थानिक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळत असल्याचे सांगत त्यांनी E20 इंधनाचे जोरदार समर्थन केले.

हेही वाचा – Advance Tip Ban : कॅब बुकिंगबाबत सरकारचा मोठी निर्णय; ‘प्री-राइड टिपिंग’वर बंदी; ॲग्रीगेटर्सना दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version