पावसाळ्यात रायगडमधील पर्यटन स्थळांवर बंदी

पावसाळ्यात रायगडमधील पर्यटन स्थळांवर बंदी

पावसाळ्याचा हंगाम सुरू होताच अनेक पर्यटक हे कोकणातील धरणे, धबधबे परिसरात पर्यटनासाठी जातात. मुंबईनजीक असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खालापूर येथील धरण आणि धबधब्यांच्या परिसरात पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात होणारे अपघात पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यातील धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन रायगडमधील पावसाळी पर्यटन स्थळांवर मनाई आदेश जारी केले आहेत. रायगडमधील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट, धरणं आणि ताम्हिणी घाटात पावसाळी पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. पावसाळी पर्यटनस्थळांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमणे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version