युक्रेनमधील टीव्ही वाहिनीच्या मनोऱ्यावर हल्ला; ८ जण ठार

युक्रेनमधील टीव्ही वाहिनीच्या मनोऱ्यावर हल्ला; ८ जण ठार

रशिया-युक्रेनमधील युद्धाचा तीढा कायम असून रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला, गोळीबार करण्यात येत आहे. रशियाच्या लष्करी सैन्याचा युक्रेनची राजधानी कीव शहरावर सतत हल्ला सुरू आहे. रशियाने युक्रेनमधील कीव शहरातील टीव्ही वाहिनीच्या मनोऱ्यावर हल्ला केला आहे. या टीव्ही मनोऱ्यावरील हल्ल्यात आठ जण ठार झाले आहेत. या इमारतीवर हल्ला झाल्यामुळे कामकाज प्रभावित झाले आहे. तसेच या इमारतींच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना रशियाने दिल्या आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस आहे. तर दिवसेंदवस रशियाचे युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र होत चालले आहेत. अशातच, युक्रेनही माघार घेण्यास तयार नसून जशास तसे उत्तर देत आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू असून रशिया युक्रेनमधील रहिवासी भागांवर निशाणा साधत असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले आहे.

युरोपियन महासंघाने युक्रेनचा सदस्यत्वाचा अर्ज स्विकारला आहे. युरोपियन सदस्यत्वानुसार, युरोपियन संघाचे देश संरक्षण नियमाने बांधील असल्यामुळे एखाद्या देशाने कोणत्याही युरोपियन संघातील सदस्य देशावर हल्ला केल्यास इतर सदस्य देशांनी त्याला मदत करावी. त्यामुळे आता युरोपियन महासंघाचा सदस्य झाल्यामुळे युक्रेनच्या सैन्याला लष्करी हल्ल्यासाठी मदत होणार आहे. तसेच युरोपियन संघामध्ये सामील झाल्यामुळे युक्रेनला आर्थिक फायदा होण्यासही मदत होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version