Amol Kolhe Big Announcement : ‘मी सावित्रीबाई..’ मालिका पुन्हा सुरू होतेयं, अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा; अचानक बंद झालेल्या मालिकेबाबत मोठा खुलासा

Amol Kolhe Big Announcement : ‘मी सावित्रीबाई..’ मालिका पुन्हा सुरू होतेयं, अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा; अचानक बंद झालेल्या मालिकेबाबत मोठा खुलासा

स्टार प्रवाहच्या ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिकेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेते डॉ अमोल कोल्हे चर्चेत आहेत. टीआरपीचे कारण देत ही मालिका बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला. यामुळे मनोरंजनसृष्टीत प्रेक्षकांसह अनेकांना मोठा धक्का बसला होता. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे ही ज्योतिराव फुले यांची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यांनी मालिका वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतू, वाहिनीवरून ही मालिका काढण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही मालिका पाहायला मिळणार आहे. ज्या आठवड्यात ही मालिका संपली त्याच आठवड्यात ही मालिका सुरु करणार असल्याची मोठी घोषणा अमोल कोल्हे यांनी केली आहे. ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका 20 जूनपासून वारसा मराठी या यूट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

हेही वाचा : Sanchita Ugale’s Death Case : संचिता आणि सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू तारखा एकच; संचिताच्या भावाने केला खळबळजनक खुलासा

याबाबत अमोल कोल्हे यांनी माहिती दिली की, “तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे शिवधनुष्य उचलतोय. ही मालिका बंद झाली, तेव्हा अनेकांनी खंत व्यक्त केली. सोशल मिडीयावर व्हिडीओज पोस्ट केले होते. या तुमच्या पाठिंब्यामुळे एक अचाट धाडस करू पाहतो आहे. शिवधनुष्य उचलू पाहतोय. मला खात्री आहे, महाराष्ट्राचा DNA रडणारा नाही लढणारा आहे.” असं ते म्हणाले. 20 जूनपासून मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले मालिका सुरु होतेयं. 20 जूनला संध्याकाळी  सहा वाजता या मालिकेचा प्रीमियर होईल. ही मालिका ‘ मराठी वारसा’ या youtube channel ला सुरु होणार आहे. मराठी मनोरंजन विश्वाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. मनोरंजन विश्वातला हा आपण पहिला प्रयोग करून पहतोय. हा आपला इतिहास आहे, हा आपलं अभिमान आहे. तो त्याच दिमाखात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे नव्या ढंगात आणखी दिमाखात ‘सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिका सुरु होते आहे. आठवड्यातून 2 दिवस, दर बुधवार आणि शनिवारी मालिकेचे नवे एपिसोड तुम्हाला पाहता येतील. तुमचं प्रेम पाठींबा आणि जी खदखद होती की, ही मालिका आता पाहायला मिळणार नाही. पण आता जिथे मालिका संपली तिथून पुढचा संपूर्ण इतिहास, स्त्री साक्षरतेचा जो महायज्ञ आहे, हा सगळं धगधगता इतिहास तुमच्या समोर घेऊन येतोय’, असं डॉ. अमोल कोल्हे यांनी नमूद केले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version