दिल्लीत खळबळ! अभिजित दीपके पोलिसांच्या ताब्यात; CJP चा धक्कादायक दावा

दिल्लीतील संसद मार्चदरम्यान कॉकरोच जनता पार्टीने अभिजित दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.
दिल्लीत खळबळ! अभिजित दीपके पोलिसांच्या ताब्यात; CJP चा धक्कादायक दावा

राजधानी दिल्लीतील संसद मार्चदरम्यान आंदोलनाला आणखी नाट्यमय वळण मिळाले आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर आंदोलनस्थळी तणाव वाढला असून आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या मोर्चादरम्यान मोठ्या संख्येने आंदोलक पुढे सरकत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी कडक बंदोबस्त केला. काही ठिकाणी परिस्थिती चिघळल्यानंतर जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला. यामुळे संसद परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

याचदरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी अभिजित दीपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला. तसेच त्यांनी देशातील विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही केले.दीपके यांना ताब्यात घेतल्याच्या दाव्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची भावना वाढल्याचे दिसून आले. संसद परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version