पुण्यात मैत्रीणीकडून ‘जीवलग’ मित्राची चाकूने हत्या

पुण्यात मैत्रीणीकडून ‘जीवलग’ मित्राची चाकूने हत्या

पुणे, २९ मे २०२३, प्रतिनिधी : राग अनावर झाल्याने मैत्रीणीने जीवलग मित्रावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला. दरम्यान, तिला देखील चाकू लागल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास लोणीकंद पोलिस स्टेशनच्या अंकित असलेल्या वाघोली पोलिस चौकीमधील रायसोनी कॉलेज जवळील मित्राच्या खोलीध्ये घडली आहे.

अनुजा महेश पन्हाळे असे जखमी झालेल्या तरूणीचे नाव आहे. तिने यशवंत अशोक मुंडे याचा खून केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यशवंत मुंडे आणि अनुजा पन्हाळे हे दोघेही वाघोली परिसरातील रायसोनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. कॉलेजमध्ये परीक्षा सुरू असल्याने दोघेही एकत्रित अभ्यास करीत होते. रविवारी रात्री अनुजा पन्हाळे ही यशवंत मुंडेच्या खोलीवर अभ्यासासाठी गेली होती. सोमवारी पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये नाजुक कारणावरून वाद झाले.

वाद चांगलाच भडकल्यानंतर अनुजाने खोलीमध्ये असलेला भाजी कापण्याचा चाकू हातात घेवुन यशवंत मुंडेवर सपासप वार केले. दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. तीक्ष्ण चाकुचे वार झाल्याने यशवंतचा मृत्यू झाला तर अनुजा पन्हाळे देखील जखमी झाली.

अनुजा पन्हाळे हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version