Swabhimaan Parv: 1000 वर्षांचा इतिहास अन् 108 घोडे, मोदींची उपस्थिती… सोमनाथमध्ये नक्की काय घडतंय?

सोमनाथ मंदिरावर 1026 मध्ये महमूद गझनवीने केलेल्या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण होत असताना, हे मंदिर भारताच्या लवचिकता, राष्ट्रीय अभिमान आणि अतूट भक्तीचे प्रतीक म्हणून पुन्हा एकदा जगासमोर येत आहे.<br/>
Swabhimaan Parv: 1000 वर्षांचा इतिहास अन् 108 घोडे, मोदींची उपस्थिती… सोमनाथमध्ये नक्की काय घडतंय?

Swabhimaan Parv:  पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून गुजरातच्या 3 दिवसीय दौऱ्यावर असून, राजकोटमधील हिरासर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ असून, पंतप्रधान यामध्ये सहभागी होत भारताच्या समृद्ध सभ्यतागत आणि आध्यात्मिक वारशाचा गौरव करणार आहेत. सोमनाथ मंदिरावर 1026 मध्ये महमूद गझनवीने केलेल्या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण होत असताना, हे मंदिर भारताच्या लवचिकता, राष्ट्रीय अभिमान आणि अतूट भक्तीचे प्रतीक म्हणून पुन्हा एकदा जगासमोर येत आहे.

हेही वाचा – Indian Railway : ब्रिटीशकालीन गुलामीच्या खुणा पुसणार! रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय; आता ‘ही’ गोष्ट होणार कालबाह्य

72 तासांचा अखंड जप आणि शौर्य यात्रा 

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून शेकडो संत सोमनाथ येथे दाखल झाले आहेत. ‘ओम’ मंत्राच्या 72 तासांच्या अखंड जपाने संपूर्ण मंदिर परिसर आध्यात्मिक उर्जेने भारून गेला आहे. या पर्वाचे खास आकर्षण म्हणजे रविवारी, 11 जानेवारी रोजी निघणारी ‘शौर्य यात्रा’. सकाळी 9:45 वाजता निघणाऱ्या या औपचारिक मिरवणुकीत 108 घोड्यांची प्रतीकात्मक परेड होणार असून, त्याद्वारे शतकानुशतके मंदिराचे रक्षण करणाऱ्या शूर योद्ध्यांना मानवंदना दिली जाईल. पंतप्रधान स्वतः या यात्रेत सहभागी होऊन भारताच्या शौर्याचा सन्मान करतील.

हेही वाचा – Who is Pramila Srinivasan? : Zohoचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांना झटका; न्यायालयाने बजावला 1.7 अब्ज डॉलर्सचा बॉण्ड, कोण आहेत प्रमिला श्रीनिवासन?

पुनर्बांधणीची 75 वर्षे आणि आधुनिक सोहळा 

दरम्यान, 2026 हे वर्ष सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे ही वर्ष आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पुनर्बांधणीमुळे मंदिराला प्राचीन वैभव प्राप्त झाले होते. पंतप्रधान मोदींनी या सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, ‘स्वाभिमान पर्व हे आपल्या आध्यात्मिक परंपरेचे आणि भारतमातेच्या असंख्य शूर सुपुत्रांच्या बलिदानाचे प्रतिबिंब आहे.’ संध्याकाळच्या वेळी होणारा भव्य ड्रोन शो आणि मंत्रोच्चार मंदिराच्या ऐतिहासिक भूमिकेवर प्रकाश टाकणार आहेत. पंतप्रधान मोदी सोमनाथ मंदिरात विशेष पूजा आणि दर्शन घेणार असून, त्यानंतर एका जाहीर सभेतून देशवासियांना संबोधित करतील. या दौऱ्यामुळे सोमनाथच्या धार्मिक पर्यटनाला आणि सांस्कृतिक अस्मितेला नवी चालना मिळणार आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version