युक्रेनमधील २०० भारतीय दिल्लीत दाखल

युक्रेनमधील २०० भारतीय दिल्लीत दाखल

रशिया-युक्रेन युद्धाचा आज आठवा दिवस असून युद्धाचा तीढा अद्याप कायम आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अनेक भारतीय रहिवासी अडकले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या आहे. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशातच, ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणत आहेत. दरम्यान, ऑपरेशन गंगाच्या अंतर्गत २०० विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आहेत.

हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर हे विमान २०० भारतीयांसह रात्री उशीरा रोमानियाहून दिल्लीला परतले. गुरुवारपर्यंत ४ ग्लोबमास्टर विमाने ८०० भारतीय विद्यार्थ्यांसह देशात परतणार आहेत. पोलंड आणि हंगेरीहून गुरुवारी पहाटे दोन विमाने परततील. १० विमानांतून २,३०५ भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आले. हंगेरीतील बुडापेस्टहून स्पाईसजेटचे विमान आले. युक्रेनलगतच्या ७ देशांतून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमाने आले आहेत. आज २०० विद्यार्थी बुखारेस्टच्या विशेष विमानातून भारतीय मायदेशी परतले आहेत.

युक्रेनमधील वोकझाल परिसरात ६०० भारतीय अडकले

रशिया-युक्रेन युद्धामध्ये रशियाची युक्रेनवर तीव्र चढाई सुरू असून युक्रेनमधील वोकझाल परिसरात अद्याप ६०० भारतीय अडकले आहेत. दरम्यान, युक्रेन नागरिकांकडून भारतीयांना धक्काबुक्की करण्यात आली असून भारतीयांना धमकवत हवेत गोळीबार करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version