पुणे जिल्ह्यातील 130 गावांमध्ये पिण्याचं पाणी दूषित आढळून आलं आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. शिवाय 13 गावांमधील पाण्यातील क्लोरीनचं प्रमाण 20 टक्क्यांपेक्षाही कमी आढळून आलंय.
पुणे जिल्ह्यातून 2918 पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. ज्यामध्ये 259 नमुने दूषित असल्याचं समोर आलं. सर्वाधिक दूषित पाणी खेड तालुक्यातील 18 गावांमध्ये आढळून आल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.
आंबेगाव – 308 31 15
बारामती – 253 19 07
भोर – 165 17 14
दौंड – 148 15 15
हवेली – 174 10 04
इंदापूर – 387 33 09
जुन्नर – 387 33 15
खेड – 321 25 18
मावळ – 166 12 05
मुळशी – 160 17 09
पुरंदर – 157 08 05
शिरूर – 213 22 11
वेल्हे – 79 07 03
एकूण – 2918 259 130
दूषित पाण्याचे नमुने आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने त्या पद्धतीने उपाययोजना केल्या असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.