सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सिंधुदुर्ग किल्याला भेट दिली. सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या राजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सिंधुदुर्ग किल्यावरील भवानी मंदिराचेही त्यांनी दर्शन घेतले. भागवत यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. यावेळी भागवत यांनी किल्ल्यात राहणारे रहिवासी आणि शिवराजेश्वर देवस्थान न्यास प्रमुख यांच्याशी संवाद साधला. तसेच ऐतिहासिक वास्तूची पाहणी करत माहितीही जाणून घेतली.
किल्ल्यांचे संवर्धन हा स्व-जागृतीचा उत्तम उपाय आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ राज्यातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्थेने हाती घेतलेल्या किल्ल्यांचे जतन, संवर्धन उपक्रमाला माझा पूर्ण पाठींबा आणि प्रोत्साहन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अविभाज्य भाग असलेल्या किल्ल्यांचे जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.