Ladaki Bahin Yojna : लाडक्या बहिणी सरकारवर नाराज? तब्बल दोन हजार महिलांचा योजनेचा लाभ घेण्यास नकार; कारण काय?

जळगाव जिल्ह्यात दोन हजार लाडक्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला आहे.
Ladaki Bahin Yojna : लाडक्या बहिणी सरकारवर नाराज? तब्बल दोन हजार महिलांचा योजनेचा लाभ घेण्यास नकार; कारण काय?

एका वेळी एकच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार असल्याच्या शासनाच्या धोरणामुळे जळगाव जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी दोन हजार लाडक्या बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ आम्हाला नको असल्याचा अर्ज जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांच्याकडे दिले आहे.

निवडणुकी पूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना अमलात आणली होती,त्याला महिलांनी मोठा प्रतिसाद देत, युती सरकारला मोठ्या मताधिक्याने विजयी केले होते मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करून, 9200000 लाडक्या बहिणी कमी केल्या आहेत.

हेही वाचा- ST Bus Smart Card: एसटी प्रवाशांनो लक्ष द्या! NCMC स्मार्ट कार्ड सक्तीची अंतिम मुदत वाढवली,जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार अर्ज

अनेक महिला के वाय सी पूर्ण करू शकल्या नसल्याने, त्याही बाद झाल्याच चित्र आहे. तर दुसरीकडे काही महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असताना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ  घेण्यासाठी अर्ज केले होते. त्या ठिकाणी ते अर्ज मंजूर झाले असले तरी एका वेळी एकाच योजनेचा लाभ घेता येणार असल्याने, जळगाव जिल्ह्यात दोन हजार महिलांनी संजय गांधी योजनेचा लाभ आपण घेणार असल्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावा असा अर्ज जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडे केला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version