Viral Video : चांगलीच जिरली! घरातील एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकला चोर; व्हिडिओ तुफान व्हायरल

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेला एक तरुण चक्क किचनमधील एक्झॉस्ट फॅनच्या छोट्या छिद्रात (शाफ्ट) अडकला. जवळपास 1 तास तो तिथेच हतबल होऊन लटकत होता.
Viral Video : चांगलीच जिरली! घरातील एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकला चोर; व्हिडिओ तुफान व्हायरल

Rajasthan Thief Stuck in Kitchen Exhaust Fan Shaft :  राजस्थानमधील कोटा शहरात एका चोराचा चोरी करण्याचा प्रयत्न अत्यंत हास्यास्पद आणि तितकाच थरारक पद्धतीने फसला. चित्रपटालाही मागे टाकेल असा हा प्रकार घडला असून, चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेला एक तरुण चक्क किचनमधील एक्झॉस्ट फॅनच्या छोट्या छिद्रात (शाफ्ट) अडकला. जवळपास 1 तास तो तिथेच हतबल होऊन लटकत होता. घरमालक बाहेरगावी गेलेले असताना हा प्रकार घडला, मात्र चोराचे नशीब इतके खराब की त्याला बाहेर पडणेही अशक्य झाले.

मध्यरात्री मालकिणीने पाहिले धक्कादायक दृश्य
ही घटना सुभाष कुमार रावत यांच्या घरी घडली. ते 3 जानेवारी रोजी खाटूश्यामजीला दर्शनासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे 1 च्या सुमारास रावत यांची पत्नी घरी परतली आणि तिने घराचा मुख्य दरवाजा उघडला. घराबाहेर उभ्या असलेल्या स्कूटरच्या हेडलाईटचा प्रकाश थेट किचनमध्ये पडला आणि त्यांना समोर जे दिसले ते पाहून त्यांचा विश्वासच बसेना. एक्झॉस्ट फॅनच्या जागेतून एक व्यक्ती अर्धवट आत आणि अर्धवट बाहेर अशा अवस्थेत अडकलेली त्यांना दिसली.

जोडीदाराने साथ सोडून काढला पळ
मिळालेल्या माहितीनुसार, या चोराने घरात शिरण्यासाठी एक्झॉस्ट फॅनच्या जागेची निवड केली होती. मात्र, त्या अरुंद छिद्रातून स्वतःला झोकून देताना तो मध्यभागीच घट्ट अडकला. विशेष म्हणजे, त्याचा एक साथीदार बाहेर त्याची वाट पाहत उभा होता. पण अडकलेल्या चोराची आरडाओरड आणि लोकांची चाहूल लागताच, मदत करण्याऐवजी तो जोडीदार त्याला तिथेच सोडून पळ काढण्यात यशस्वी झाला.

हेही वाचा – रस्त्यावर ‘चांदीच चांदी!’ हायवेवर प्रवाशांची ही झुंबड आणि.. सत्य जाणून पोलीसही चक्रावले

पोलिस स्टिकर असलेल्या गाडीचा वापर
या घटनेत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी ज्या कारने आले होते, त्यावर पोलिसांचे स्टिकर लावलेले होते. संशय येऊ नये म्हणून त्यांनी हा बनाव केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. दरम्यान, तो चोर अडकल्याचे पाहून परिसरात मोठी गर्दी जमली होती आणि जवळपास 1 तास हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. उपस्थितांनी या प्रकाराचा व्हिडिओ बनवला, जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अखेर सुटका आणि पोलिस कोठडी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्या चोराला एक्झॉस्ट फॅनच्या शाफ्टमधून बाहेर काढले आणि लगेचच ताब्यात घेतले. या चोराचा इतर कोणत्या गुन्ह्यांत सहभाग आहे का आणि पळून गेलेल्या त्याच्या साथीदाराचा शोध आता पोलीस घेत आहेत. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराची ही अशी अवस्था पाहून सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – Rajgad Trekkers Accident : भयंकर! राजगडला ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाश्यांचा हल्ला; स्थानिकांच्या मदतीने कड्यामध्ये अडकलेली मुलं बचावली

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version