Supriya Sule Kangana Ranaut Dance Video: खासदार सुप्रिया सुळे, कंगना रणौत आणि महुआ मोईत्रा यांचा एकत्र डान्स!

या व्हिडिओमध्ये 'ओम शांती ओम' या चित्रपटातील एका गाण्यावर सुप्रिया सुळे, कंगना रणौत आणि महुआ मोईत्रा या तीनही खासदार नृत्य करत असल्याचे दिसत आहे.
Supriya Sule Kangana Ranaut Dance Video: खासदार सुप्रिया सुळे, कंगना रणौत आणि महुआ मोईत्रा यांचा एकत्र डान्स!

Supriya Sule Kangana Ranaut Dance Video: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या तीनही प्रमुख खासदार एका लग्न समारंभात एकत्र नृत्य (Supriya Sule Wedding Ceremony Dance) करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ भाजपाचे खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यातील (Naveen Jindal Daughter’s Wedding) असल्याचे सांगितले जात आहे.

बॉलिवूड गाण्यावर थिरकल्या खासदार
या व्हिडिओमध्ये ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील एका गाण्यावर सुप्रिया सुळे, कंगना रणौत आणि महुआ मोईत्रा या तीनही खासदार नृत्य करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्यासोबत नवीन जिंदाल हे देखील त्या व्यासपीठाच्या मध्यभागी उपस्थित असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते. या तीन नेत्यांच्या एकत्र डान्समुळे हा व्हिडिओ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

नृत्याच्या तालमीचा फोटोही झाला होता व्हायरल
यापूर्वी, नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असताना, या लग्नात खासदार नृत्य सादर करणार असल्याच्या नृत्याच्या तालमीचा (Supriya Sule Dance Rehearsal) एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो कंगना रणौत यांनी स्वतः पोस्ट केला होता आणि सोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “सहकारी खासदारांसोबत सिनेमातील क्षण अनुभवले. नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमानिमित्त सराव करण्यात आला.”

हेही वाचा – Goa Night Club Fire: डान्सरसोबत थिरकणारे लोक.. आणि अचानक आग! गोवा नाईट क्लब दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर उमटल्या होत्या प्रतिक्रिया
कंगना रणौत यांनी शेअर केलेला हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काही हँडल्सवरून या फोटोवर टीका करण्यात आली होती. एका अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. “अशाप्रकारे राजकारणी तुम्हाला मूर्ख बनवतात…”, अशा आशयाची पोस्ट या अकाउंटवर शेअर करण्यात आली होती.

उद्योगपती आणि राजकारणी नवीन जिंदाल
नवीन जिंदाल हे एक प्रसिद्ध उद्योगपती (Industrialist Politician Naveen Jindal) आणि राजकारणी आहेत. त्यांनी वर्ष 2004 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता आणि वर्ष 2009 मध्येही त्यांनी पुन्हा विजय मिळवला. वर्ष 2014 मध्ये त्यांचा निवडणुकीत पराभव झाला, तर वर्ष 2019 मध्ये काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नव्हते. त्यानंतर वर्ष 2024 मध्ये त्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आणि कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा संसदेवर गेले.

हेही वाचा – Radhika Merchant Speak Marathi : “मी स्वदेशमध्ये हे घालेन” अन् ‘त्या’ कृतीने अंबानींच्या सूनेने महाराष्ट्रातील जनतेच मन जिंकलं; Viral Video पाहिलात का?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version