MPSC Paper Leak : MPSC पेपरफुटीवरून मुंबईत मोठा राडा! संभाजी ब्रिगेड आक्रमक, कार्यालयात घुसून सचिवांच्या तोंडाला काळं फासलं

महाराष्ट्रात सध्या MPSC पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांचा आणि संघटनेचा उद्रेक पाहायला मिळाला. पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर उतरुन MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.
MPSC Paper Leak : MPSC पेपरफुटीवरून मुंबईत मोठा राडा! संभाजी ब्रिगेड आक्रमक, कार्यालयात घुसून सचिवांच्या तोंडाला काळं फासलं

महाराष्ट्रात सध्या MPSC पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांचा आणि संघटनेचा उद्रेक पाहायला मिळाला. पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर उतरुन MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. रोहित पवारही MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान आज नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळ फासलं.

हेही वाचा- Gunaratna Sadavarte On Eknath Shine: “एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही” सदावर्तेंचा मोठा दावा; राजकीय वातावरण तापलं

MPSC पेपरफुटी प्रकरणी 3 ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वात राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासनाला स्पष्ट इशारा देऊनही सरकारने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासनाला वारंवार इशारा देऊनही कारवाई होत नसल्याने, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 

पेपर फुटीमध्ये MPSC मध्ये काम करणाऱ्या लोकांचा सहभाग असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप असून MPSC चे अध्यक्ष आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याचपार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज एमपीएससी सचिवांच्या तोंडाला काळं फासून एकप्रकारे त्यांच्या अध्यक्षांना इशारा दिला आहे. मुंबईतील या अचानक झालेल्या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून MPSC कार्यालयाबाहेर गदारोळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version