Pradhan Mantri Viksit Bharat Rozgar Yojana: देशातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासोबतच औपचारिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्र शासनाकडून 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' (PMVBRY) सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य हेतू देशातील जास्तीत जास्त नवोदित कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सामाजिक सुरक्षा जाळ्याखाली आणणे हा आहे. या योजनेचा फायदा केवळ नवीन कर्मचाऱ्यांनाच नाही, तर त्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांनाही (नियोक्त्यांना) होणार आहे.
योजनेचे स्वरूप आणि 15,000 रुपयांपर्यंतचे मिळणारे आर्थिक प्रोत्साहन
या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरीत रुजू होणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना सरकारकडून कमाल 15,000 रुपयांपर्यंतची प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे. मात्र, ही प्रोत्साहन रक्कम कर्मचाऱ्याच्या नोंदणीकृत मासिक वेतनानुसार निश्चित केली जाईल:
मासिक वेतनानुसार प्रोत्साहन: जर कर्मचाऱ्याचे नोंदणीकृत EPF मासिक वेतन 8,000 रुपये असेल, तर त्याला सरकारकडून 8,000 रुपयांचेच प्रोत्साहन मिळेल.
कमाल मर्यादा: 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी या आर्थिक प्रोत्साहनाची कमाल मर्यादा 15,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या प्रमुख अटी आणि पात्रता
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा (PMVBRY) लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे.
EPFO नोंदणी कालावधी: कर्मचारी 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत पहिल्यांदाच EPFOशी जोडला गेलेला असावा.
उत्पन्नाची अट: या योजनेचा लाभ प्रामुख्याने 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच घेता येईल.
पहिलाच रोजगार: ही योजना केवळ आयुष्यात प्रथमच औपचारिक क्षेत्रात नोकरीला लागलेल्या तरुणांसाठीच लागू असेल.
हेही वाचा – LPG eKYC Update: LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी! ई-केवायसीची मुदत संपली; आता पुन्हा करावी लागणार ReKYC ?
दोन हप्त्यांमध्ये होणार वितरण; ' फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम' पूर्ण करणे आवश्यक
पात्र कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन रक्कम थेट दोन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये वितरित केली जाईल.
पहिला हप्ता: नोकरीचे पहिले 6 महिने पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्याला 7,500 रुपये मिळतील.
दूसरा हप्ता: सेवेचे 12 महिने पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होईल.
महत्त्वाची अट: नोकरीचा 12 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर दुसरा हप्ता मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने 'Financial Literacy Programme' (आर्थिक साक्षरता कार्यक्रम) यशस्वीरीत्या पूर्ण करणे बंधनकारक आहे.
नोकरी देणाऱ्या कंपन्यांनाही (नियोक्त्यांना) मिळणार मोठा फायदा
कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठीही या योजनेत विशेष तरतूद करण्यात आली आहे. योजनेच्या अटी पूर्ण करणाऱ्या कंपनीला प्रत्येक अतिरिक्त नवीन कर्मचाऱ्यामागे दरमहा 3,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाईल. कंपन्यांना हा आर्थिक लाभ सलग 2 वर्षांपर्यंत पुरवला जाणार आहे, ज्यामुळे देशात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यास मोठे प्रोत्साहन मिळेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.