Marathi Medium Schools : नवी मुंबई महापालिकेच्या शाळांचा ‘मेकओव्हर’ की मराठी भाषेवर घाला?; मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा प्रस्ताव

गरीब विद्यार्थ्यांनाही इंग्रजी शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा निर्णय घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावर राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Marathi Medium Schools : नवी मुंबई महापालिकेच्या शाळांचा ‘मेकओव्हर’ की मराठी भाषेवर घाला?; मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा प्रस्ताव

नवी मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेचा मुद्दा नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. मराठी भाषा, मराठी शिक्षण आणि मराठी शाळांबाबतचे प्रश्न वेळोवेळी चर्चेत येत असतानाच आता नवी मुंबईतून एक मोठी आणि चर्चेची ठरणारी बातमी समोर आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबाबत मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचे इंग्रजी माध्यमात रूपांतर करण्याचा प्रस्ताव लवकरच महासभेत मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी महासभेत शिक्षण प्रसाराशी संबंधित हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भातील अधिक माहिती जय महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा: Ashok Kharat Case: पोलिसांनाच दिला ‘शाप’! म्हणाला ‘तुमच्यावर कोप होईल…’; अटकेवेळी अशोक खरातचा थयथयाट, पोलिसी ‘खाक्या’ दाखवताच भोंदूगिरीचा फुगा फुटला

या प्रस्तावानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचे टप्प्याटप्प्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये रूपांतर करण्याचा विचार आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर मराठी माध्यमाच्या शाळा असल्याने त्यांचे इंग्रजी माध्यमात रूपांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात बोलताना सागर नाईक यांनी सांगितले की, गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलांनाही इंग्रजी शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात येत आहे. “जे या निर्णयाला विरोध करत आहेत त्यांनी आधी स्वतःची मुले कोणत्या शाळांमध्ये शिकत आहेत हे तपासावे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हा प्रस्ताव महासभेत मांडल्यानंतर विरोधकांची भूमिका काय असेल आणि या मुद्द्याला राजकीय वळण कसे मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात हा मुद्दा पुढील काही दिवसांत चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Election Commission of India: राजकीय जाहिरातींसाठी आता ‘सेन्सॉरशिप’; निवडणूक आयोगाचा मोठा आदेश, पाहा काय आहेत नवे नियम?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version