Teacher Salary : राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केली नाही तर शिक्षकांना पगार मिळणार नाही; काय आहे नवीन नियम?

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने शालार्थ प्रणालीतील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.
Teacher Salary : राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केली नाही तर शिक्षकांना पगार मिळणार नाही; काय आहे नवीन नियम?

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अर्थ खात्याच्या 28 जुलै 2026 रोजी झालेल्या बैठकीत शालार्थ प्रणालीतील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांची ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने शालार्थ प्रणालीतील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.

महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेले असताना देखील अनेक कर्मचाऱ्यांची ही प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे आता कठोर भूमिका घेण्यात आली आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास ऑगस्ट महिन्याचे वेतन रोखण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा- Pensioners Protest: EPS-95 पेन्शनधारकांचे केंद्र सरकारविरोधात रणशिंग; 5 ऑगस्टला दिल्लीत आंदोलनाची हाक; काय आहेत प्रमुख मागण्या?

वेतन प्रक्रियेत अडचणी टाळण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. तर यामध्ये यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर हा आदेश अनुदानित शाळा, खासगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शालार्थ प्रणालीतून वेतन घेणारे सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे याबाबींकडे दुर्लक्ष केल्याचा थेट परिणाम शिक्षकांच्या वेतनावर होऊ शकतो. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version