इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाने आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि वायूच्या किमती खिळखिळी होण्याची चिन्हे दिसत आहेत. मध्य पूर्वेतील कोणत्याही तणाव किंवा युद्धाचा जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होतो. दरम्यान मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमिवर भारतात पेट्रोल आणि एलपीजीच्या किमती वाढल्याचे चित्र दिसत आहे. युद्धाच्या झळा भारतातल्या लोकांना बसणार आहेत. LPG, PNG, CNG, क्रूड ऑइलचा साठा मर्यादीत असल्याने या सगळ्याच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. या नवीन किमती आज, 7 मार्च रोजी लागू झाल्या असून एलपीजी सिलेंडरच्या किमतीत काय बदल झालेत ते जाणून घ्या…
हेही वाचा- Middle East Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; उद्योगांसाठीचा गॅस पुरवठा तात्पुरता स्थगित, तर घरगुती गॅस …
यादरम्यान 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 60 रुपयांनी वाढले आहेत. तसेच 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 115 रुपयांनी वाढली आहे. यादरम्यान मुंबईत, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,835 पर्यंत वाढली असून दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 836 वरून 913 झाली आहे, तर व्यावसायिक सिलिंडर आता दिल्लीत 1883 मध्ये उपलब्ध होईल. गॅसच्या दरवाढीचा परिणाम केवळ सामान्य जनतेवरच नाही तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांवरही होण्याची शक्यता आहे. तसेच आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.