Milk Rates: मोठी बातमी! सुट्या दुधाच्या दरात तब्बल 10 रुपयांनी वाढ; नागरिकांच्या खिशाला कात्री

संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही महागाईच्या झळा बसत आहेत. महागलेल्या इंधनासोबत आता सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी आणखी एक दरवाढ समोर आली आहे.
Milk Rates: मोठी बातमी! सुट्या दुधाच्या दरात तब्बल 10 रुपयांनी वाढ; नागरिकांच्या खिशाला कात्री

संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही महागाईच्या झळा बसत आहेत. महागलेल्या इंधनासोबत आता सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी आणखी एक दरवाढ समोर आली आहे. रोजच्या वापरातून दुधाच्या किंमती महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात तब्बल 10 रुपयांनी वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा- IAS Tukaram Mundhe : आयुक्त तुकाराम मुंढेंचा ‘एफडीए’मध्ये 30 दिवसांत महाधडाका; 900 हून अधिक छाप्यांनी भेसळखोरांचे धाबे दणाणले!

ज्या दुधाशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही, त्या दुधाच्या दरात आता मोठी वाढ झाली आहे. सुट दुधाचे भाव तब्बल 10 रुपये प्रति लिटरने वाढले असून सध्या दूध 80 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. राज्यात अन्न व औषध प्रशासन कडून भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर सुरू असलेल्या धडक कारवाईचा परिणाम आता ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेत स्पष्टपणे दिसू लागला आहे. कारवाईमुळे भेसळयुक्त दूध पुरवठ्यावर आळा बसला असला, तरी शुद्ध दुधाचा पुरवठा घटला आहे.

त्यामुळे पनीर, दही,खव्वा,तुप, लोणी, या पदार्थाचे ही दर वाढले आहेत. दुसरीकडे दुधाची मागणी कायम असल्याने पुरवठा आणि मागणीतील तफावत वाढली असून, त्याचा थेट परिणाम दरवाढीच्या स्वरूपात ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडू लागला आहे. इंधन, भाज्या, फळं आणि किराणा मालासोबत दुधाच्या वाढलेल्या किंमतींनी सामान्यांचं जगणं बेहाल केलंय. वाढत्या महागाईत दुधाचीही दरवाढ करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version