Gold Price Today: आठवड्याच्या अखेरीस सोनं महागलं; चांदीतही वाढ, ग्राहक चिंतेत

आठवड्याच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. शनिवारी MCX वर सोनं 1,137 रुपयांनी महागून 1,13,766 रुपयांवर पोहोचलं.
Gold Price Today: आठवड्याच्या अखेरीस सोनं महागलं; चांदीतही वाढ, ग्राहक चिंतेत

मुंबई – आठवड्याचा शेवटचा दिवस सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ घेऊन आला आहे. गेल्या सात दिवसांत सोन्याने उच्चांक गाठला असून, सणासुदीच्या काळात दरवाढीचा ट्रेंड कायम राहिला आहे. दसरा आणि दिवाळी अगदी दारात उभे असताना सराफा बाजारातील वाढलेल्या किमतींनी ग्राहकांना काळजीत टाकलं आहे.

शनिवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोन्याच्या वायद्याच्या किमतीत तब्बल 1,137 रुपयांची वाढ झाली. आता सोन्याचा भाव 1,13,766 रुपयांवर पोहोचला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,05,850 रुपये नोंदवला गेला तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,15,480 रुपये झाला. सराफा बाजारात सोनं 600 रुपयांनी महागलं असून, चांदीच्या भावातही तितकीच वाढ झाली आहे. एक किलो चांदीसाठी आता 1,49,000 रुपये मोजावे लागत आहेत.

हेही वाचा –RBI News : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा महत्त्वाचा निर्णय; मृत खातेदारांच्या दाव्यांचे निवारण 15 दिवसांत होणार

शहरनिहाय पाहिल्यास मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे या सर्वच ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,05,850 रुपये झाला आहे, जो काल 1,05,300 रुपये होता. त्याचप्रमाणे 24 कॅरेट सोनं मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि ठाण्यात 1,15,480 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जात आहे. कालचा दर 1,14,880 रुपये होता. जळगावमध्ये कालचा भाव 1,15,690 रुपये होता, मात्र आज तो घसरून 1,15,480 रुपये झाला आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana New Update : 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना मिळणार शून्य व्याजदराने कर्ज 

सणांचा हंगाम जसजसा पुढे सरकतोय, तसतशी सोन्याची मागणी आणि दर दोन्ही वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दसरा, दिवाळी आणि लग्नसराईत खरेदी करणार्‍यांनी सजग राहण्याची गरज आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version