Aghori Video Viral: मृतदेहाची राख तोंडाला फासली.. जळत्या चितेसमोर तलवार अन् मानवी मांस.. अघोरी तृतीयपंथी साधकाच्या कृत्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप

चितेची राख अंगाला फासणे आणि भुतांसोबत खेळणे हे आपले नेहमीचे काम असल्याचे सांगत या अघोरी तृतीयपंथीयाने स्वतःच्या तांत्रिक शक्तींची बढाई मारली.
Aghori Video Viral: मृतदेहाची राख तोंडाला फासली.. जळत्या चितेसमोर तलवार अन् मानवी मांस.. अघोरी तृतीयपंथी साधकाच्या कृत्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप

Aghori Transgender Video Viral: मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध चक्रतीर्थ स्मशानभूमीत घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे धार्मिक वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे. काली उर्फ नंद गिरी या तृतीयपंथी अघोरी साधकाने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून (‘digambarladyaghorinagasadhvi’) एक अस्वस्थ करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित साधक हातात तलवार घेऊन एका जळत्या चितेजवळ उभा असल्याचे दिसते. तोंडाने काहीतरी बडबडत असतानाच चितेत तलवार घालून कथित मानवी मांसाचा तुकडा बाहेर काढून तो कच्चा खाल्ल्याचा दावा त्याने व्हिडिओत केला आहे.  

‘गरम गरम राख लावू…’ म्हणत तांत्रिक सामर्थ्याचे प्रदर्शन
व्हायरल व्हिडिओमध्ये काली उर्फ नंद गिरी ‘जय माता दी’ म्हणत ‘आज गरम गरम राख लावू,’ असे म्हणताना ऐकू येते. चितेतील कथित मानवी अवशेष अत्यंत गरम आणि चवदार असल्याचे वर्णनही त्याने व्हिडिओदरम्यान केले आहे. एवढेच नव्हे तर, चितेची राख अंगाला फासणे आणि भुतांसोबत खेळणे हे आपले नेहमीचे काम असल्याचे सांगत त्याने स्वतःच्या तांत्रिक शक्तींची बढाई मारली. अनेक मोठ्या तांत्रिकांना हरवल्याचा दावा करत इतरांनी आपल्यापासून सावध राहावे, असा इशाराही त्याने दिला आहे.

संत समाजाचा तीव्र आक्षेप
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महामंडलेश्वर शेळेशनंद महाराज यांच्यासह अनेक प्रमुख संतांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अघोर साधना आणि तांत्रिक विधी हे अत्यंत गोपनीय अन् कडक मर्यादा पाळणारे असतात, असे स्पष्ट करत सार्वजनिक प्रदर्शन करणाऱ्या वृत्तीचा धिक्कार केला. वैयक्तिक प्रसिद्धी व स्टंटबाजीसाठी परंपरेचा असा वापर करणाऱ्याला ‘कालनेमी साधक’ संबोधत त्यांनी हे कृत्य संप्रदायाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. आधुनिक समाजात मानवी मांस खाणे ही राक्षसी प्रवृत्ती मानली जाते, असेही महामंडलेश्वरांनी नमूद केले.

हेही वाचा – Pimpri Chinchwad Viral Video: रील्सच्या नादात महामार्ग रोखला! पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पोलिसांत रीतसर तक्रार; BNS च्या कलम 301 अंतर्गत कारवाईची मागणी
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अघोरी अखाड्याचे पीठाधीश्वर आणि राष्ट्रीय अध्यक्ष खडेश्वरी अघोरी बाबा विष्णुनाथ यांनी उज्जैन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सनातन आणि अघोर परंपरेच्या नावाखाली ढोंग पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तक्रारीनुसार, चितेतील वस्तू आणि मृतदेहाच्या अवशेषांशी केलेली छेडछाड ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर तपासणीत ते खरोखरच मानवी अवशेष असल्याचे निष्पन्न झाले, तर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 301 अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गढकालिका वादानंतर कारवाई; किन्नर आखाड्यातून हकालपट्टी
या वादाची पार्श्वभूमी केवळ स्मशानभूमीपुरती मर्यादित नसून, याआधी गढकालिका माता मंदिरात झालेल्या एका वादानंतर संबंधित अघोरी किन्नरावर कारवाई करण्यात आली होती. त्याला किन्नर आखाड्यातून आधीच हाकलून बाहेर काढण्यात आले असल्याचे वृत्तात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या व्हिडिओतील सत्यता पडताळण्यासाठी आणि चितेतील अवशेषांशी झालेल्या छेडछाडीचा तपास करण्यासाठी उज्जैन पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – North Cyprus Boat Accident : समुद्रात थरार! 270 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली; भीषण दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version